#CoronaVirusEffect : खंडपीठात याचिका दाखल होणार आॅनलाईन

औरंगाबाद -कोरोना व्हायरस मुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात महत्वाच्या प्रकरणातील याचिका २६ ते ३० मार्च या काळात आॅनलाईन दाखल करण्याचे आदेश रजिस्र्टार यांनी जारी केले आहेत.
याचिका कर्त्याला वकीलामार्फत [email protected] या आयडीवर मेल करावा लागेल.त्या मेलचे याचिकेचे गांभिर्य पाहून आवश्यक तो रिप्लाय करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
न्यायमूर्ती एस.व्ही.गंगापूरवाला हे सिव्हील प्रकरणातील याचिका हाताळणार आहेत तर न्या.टी.व्ही. नलावडे क्रिमीनल प्रकरणातील याचिका हाताळणार आहेत.