#CoronaVirusUpdate : इटलीत कोरोनाचा कहर थांबेना , एकाच दिवसात झाले ६५१ मृत्यू

जगभरात कोरोनाचा कहर चालूच असून चीननंतर कोरोनाने इटलीत सगळ्यात जास्त धुमाकूळ घातला आहे. दररोज मृत्यूची संख्या वाढतच आहे. आज एकाच दिवसात तब्बल ६५१ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या साडपाच हजारांवर गेली आहे. यात हॉस्पिटल्समध्ये सेवा करणाऱ्यांची सख्या मोठी आहे. त्यात डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सर्व जगात कोरोनाचं थैमान सुरूच आहे. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढतोय. तर मृत्यू पडणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. कोरोनाने अख्ख जगच व्यापलं आहे. महाकाय चीनपासून ते बलाढ्य अमेरिकेपर्यंत सर्वच देश कोरोनाने ग्रासले आहेत. कोरोनामुळे बाधित असलेल्यांची रविवारी ४ वाजेपर्यंतची संख्या ३ लाख ७ हजार ३४१ असल्याची माहिती जगविख्यात Johns Hopkins University ने दिली आहे. तर मृत्यूने १३ हजारांचा आकडा पार केलाय. चीन, इटली, अमेरिका, स्पेन आणि जर्मनी हे कोरोनाग्रस्त ५ टॉप टेन देश आहेत.
Italy reports 651 new virus death, toll nears 5,500, says government: AFP news agency #CoronavirusPandemic
— ANI (@ANI) March 22, 2020
कोरोनाग्रस्त ५ टॉप टेन देशातील आकडेवारी नुसार चीनमध्ये ८१, ३९३, इटलीत ५३,५७८, स्पेनमध्ये २५,४९६ आणि जर्मनीमध्ये २२,३६४ अशी रुग्णांची संख्या आहे. ब्रिटनमध्ये ५,००० पेक्षा जास्त प्रकरणं समोर आलीत, तर २३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती पाहता ब्रिटन सरकारने काही विशेष अशा १५ लाख लोकांना ३ महिन्यांपर्यंत घरात राहण्याचा सल्ला दिला आहे. या १५ लाख नागरिकांमध्ये अशा लोकांचा समावेश आहे, ज्यांना हाडांचा कॅन्सर, ब्लड कॅन्सर, सिस्टिक फायब्रोसिससारखे गंभीर आजार आहेत आणि ज्यांनी नुकतंच अवयव प्रत्यारोपण करून घेतलेलं आहे. कम्युनिटी सेक्रेटरी रॉबर्ट जेनरिक यांनी सांगितल की, अशा लोकांनी घरात राहायला हवं, जेणेकरून वैद्यकीय सेवेवर भार येणार नाही आणि अनेकांचा जीव वाचेल.