#CoronaVirusEffect : अफवा फॉरवर्ड करू नका , रशियात वाघ , सिंह सोडल्याचा तो मॅसेज १०० टक्के अफवा….खरे काय आहे ते पहा…!!

विषय कोरोनाचा असो कि कोणताही असो सोशल मीडियावर अफवा पसरविणे काही लोकांची विकृती आहे ती काही केल्या थांबत नाही. यातून जे कुणी असे अफवा पसरविणारे मॅसेज तयार करतात त्यांना कुठल्याही परिणामाची भीती नसते पण नागरिकांनी कुठलाही मॅसेज फॉरवर्ड करणे टाळले तर अशा विकृत कृत्यांना आळा बसू शकतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे . दरम्यान कोरोना व्हायरस मुळे जगभरात हाहाकार उडाला असून दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत आहे. अनेक देशांनी शहरं आणि राज्यात लॉकडाउन घोषित केला आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर रशिया मध्ये सोशल मीडियावर एक मॅसेज व्हायरल झाला आहे. यामध्ये राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी लोकांनी घरात राहावं यासाठी आवाहन केलं. पण, लोकं काही ऐकायचं नाव घेत नाही. त्यामुळे त्यांनी रस्त्यावर ८०० सिंह आणि वाघ सोडले आहेत असा मॅसेज तुमच्या मोबाईलवरही आला आले तर तो पुढे पाठवू नका.
https://twitter.com/MohammadAhmedDh/status/1241632144843329536
कोरोनाच्या पार्शवभूमीवर पुतिन यांचा हा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या मॅसेजने अक्षरश: धूमाकूळ घातला आहे. लोकं वेगवेगळ्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर हा मॅसेज बिनदिक्कत शेअर करत आहेत . एका व्यक्तीने हा मॅसेज शेअर करत म्हटलं की, ‘पुतिन यांनी रशियन लोकांना दोन पर्याय दिले आहे एक तर दोन आठवडे घरात राहा किंवा ५ वर्ष जेलमध्ये राहावं. मध्ये कोणताच रस्ता नाही. लोकांनी घरातून निघू नये म्हणून रस्त्यावर ८०० सिंह आणि वाघ सोडले आहे. रशियामध्ये कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. ३०० हून अधिक कोरोनाबाधित रुग्णं आढळले आहे. तर एका जणाचा मृत्यू झाला आहे. देशातील अनेक भागात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरत आहे.
फॅक्ट चेकमध्ये निघालं खोटं
दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा मॅसेज तपासून पाहिला असता हे खोटं असल्याचं समोर आलं आहे. खरंतर हा व्हायरल झालेला फोटो ४ वर्षांपूर्वीचा आहे. हा फोटो २०१६ मधील डेली मेलमध्ये प्रसिद्ध झाला होता. शिवाय हा फोटो आफ्रिकेतला असून शहरात आलेल्या सिंहाचा हा फोटो होता त्याला कोणीही सोडलेले नव्हते. परंतु, फेक न्यूज या फेक असतात त्यामुळे यावर विश्वास ठेवू नका आणि पसरवू नका, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.