#CoronaVirusUpdate : आज दिवसभरात ३ मृत्यू , एकूण संख्या ७ , देशभरात चिंता

स्वास्थ्य और परिवार कल्याण विभाग, गुजरात: एक #COVID19 पॉजिटिव मरीज, 69 वर्षिय पुरुष की आज सूरत के अस्पताल में मौत हो गई। 65 साल की एक महिला की वडोदरा के अस्पताल में मौत हो गई, लेकिन COVID के लिए उनकी रिपोर्ट का इंतजार है। pic.twitter.com/YTn1peJ5TM
— ANI_HindiNews (@AHindinews) March 22, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार ‘जनता कर्फ्यु’ला आज सकाळी ७.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच दुसरीकडे आज एकाच दिवशी देशात कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता भारतातील करोना व्हायरसच्या बळींची एकूण संख्या ७ वर पोहचली आहे. तर गुजरात राज्यात करोनामुळे झालेला हा पहिलाच मृत्यू ठरलाय.
गुजरातमध्ये एका करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीनं आज अखेरचा श्वास घेतल्याचं समोर आलंय. ६९ वर्षीय वृद्धाचा सूरतच्या एका खासगी रुग्णालयात मृत्यू झालाय. करोनापीडित ही वृद्ध व्यक्ती दिल्ली – जयपूर रेल्वे प्रवास करत सूरतमध्ये पोहचली होती. हा रुग्ण अगोदरपासूनच अस्थमा आणि किडनीच्या त्रासाने त्रस्त होता. उल्लेखनीय म्हणजे, गुजरातमध्ये पहिला करोना पॉझिटिव्ह रुग्ण सूरतमध्येच सापडला होता. या शहरात राज्यातला पहिला मृत्यू झालाय. दरम्यान, देशभरात करोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ३७० वर पोहचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलीय. करोनामुळे देशात सात मृत्यू ओढावले आहेत.