#CoronaVirusUpdate : दिलासादायक बातमी , औरंगाबादेतील “ती ” महिला उपचारानंतर निगेटिव्ह !!

औरंगाबादेत एक महिला रुग्ण करोना पॉझिटिव्ह होती. योग्य वैद्यकीय उपचार आणि काळजीनंतर त्या रुग्णाचा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला आहे. शनिवारी या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.
परदेश दौरा करून परतलेल्या एका महिला रुग्णाला करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टर, परिचारिका आणि मदतनीसांचे अथक परिश्रम आणि वैद्यकीय उपचारानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. शनिवारी याबाबतचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांना प्राप्त झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासगी डॉक्टरांची टीम तसेच सर्वांच्या सहकार्यानेच हे शक्य झाल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. या महिलेच्या संपर्कात असलेल्या २१ जणांचे स्वॅब अहवालही निगेटिव्ह आल्याचे त्यांनी नमूद केले.