#CoronaVirusEffect : लंडनहून परतल्यानंतर सोनमने घेतला आयसोलेशनमध्ये उपचार घेण्याचा निर्णय

https://www.instagram.com/p/B91VDJshvay/?utm_source=ig_embed
जगभर कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जगभरातील भारतीय नागरिक भारतात परतत आहेत. या रुग्णांना सरकारकडून त्यांची तपासणी करून त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहे. सिनेअभित्री सोनमही लंडनहून भारतात परतली असून तिने स्वतःच आयसोलेशनमध्ये उपचार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. सोनमने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत याविषयीची माहिती दिली आहे. काही दिवसापूर्वी सोनम पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये गेली होती. मात्र करोना विषाणूचं सावट सर्वत्र असल्यामुळे तिने परत भारतात येण्याचा निर्णय घेतला. केवळ इतकंच नाही तर भारतात आल्यानंतर तिने स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवणार असल्याचं म्हटलं जात आहे. एक व्हिडीओ शेअर करत सोनमने ही माहिती दिली.
सोनमने आपल्या इंस्टाग्रामच्या अकाऊंट वरील पोस्ट मध्ये म्हटले आहे कि , “मी माझ्या पतीसोबत भारतात परत येण्यासाठी रवाना झाले आहे. आता अजून काळ घरापासून दूर राहू शकत नाही. लव्ह यू ऑल” देशात पोहोचल्यानंतर तिने देशात करोना विषाणूपासून वाचण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचं कौतूकही केलं. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर सोनम आणि तिच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर सोनमने स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे तिच्या अन्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी सोनमने हा निर्णय घेतला आहे.