Corona Virus Update : सरकार काळजी घेतंय पण कोणीही कोरोनाला लाइटली घेऊ नका , आदित्य ठाकरे यांचे ट्विट

This morning, as guardian minister, I held a detailed review of Mumbai Suburbs, and our preparations to deal with corona virus, with Mumbai Suburban Collector, Police officials, BEST GM, BMC AMCs, officials from FRRO, Railways, Airport- MIAL and others.
(1/n)— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 16, 2020
देशभरात करोना व्हायरसने थैमान घातलेला असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. राज्य सरकारने करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी अनेकन निर्बंध घातले असून तसे आदेश जारी केले आहेत. पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सरकारने जारी केलेल्या सूचनांचं नागरिक आणि संस्थांनी पालन केलं पाहिजे असं म्हटलं आहेत. तसंच कोणत्याही संस्थेने या परिस्थितीला लाइटली घेऊ नये अशी तंबीही दिली आहे.
आपल्या ट्विट मध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, “केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या सूचनांचं पालन सर्व नागरिक आणि संस्थांनी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने मध्यस्थी करावी अशी परिस्थिती आहे. कोणत्याही संस्थेने या परिस्थितीला कमी लेखू नये”. आदित्य ठाकरे यांनी यावेळी करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती दिली. आम्ही सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. तसंच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काळजी घेत असल्याचंही सांगितलं आहे.
कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून रुग्णांच्या संख्येत सोमवारी वाढ झाली आहे. अजून चार जणांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या ३८ वर पोहोचली आहे. यामधील तिघे मुंबईतील तर एक नवी मुंबईतील आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत सहली किंवा व्यावसायिक दौऱ्यांवर निर्बंध घातले आहेत. खासगी सहल कंपन्या (टूर ऑपरेटर) किंवा व्यक्तींना असे दौरे ३१ मार्चच्या रात्री १२ वाजेपर्यंत आयोजित करता येणार नाहीत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहितेतील कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. मॉल्स, सिनेमागृहे, नाटय़गृहे, शाळा-महाविद्यालये याबरोबरच संग्रहालयेही बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले असून मुंबईत पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन सरकारने केले आहे.