Corona Virus Effect : बॉण्ड पटातील ” या ” अभेनेत्रीलाही कोरोनाने गाठले , व्हायरसला गांभीर्याने घेण्याचा दिला सल्ला…जाणून घ्या किती मान्यवरांना झाली कोरोनाची बाधा…?

https://www.instagram.com/p/B9w1fGQhllp/
कोरोना व्हायरसने जगभर खार केला असून अमेरिकेतील हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल ओल्गा कुरिलेंकोलाही करोना व्हायरसची बाधा झाली आहे. स्वतः ओल्गाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी दिली आहे. तसेच या विषाणूला गांभीर्याने घ्या असाही संदेश तिने यावेळी दिला. ओल्गाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिला करोना विषाणूची लागण झाल्याचे सांगितले. ओलेगाने २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या जेम्स बॉण्ड सिनेमात काम केले होते.
दरम्यान इंस्टाग्रामवरून ओल्गाने बंद खोलीचा फोटो शेअर केला असून या फोटोच्या सोबत दिलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, गेल्या आठवड्याभरापासून आजारी होते. करोना व्हायरसची टेस्ट केली असता ती पॉझिटीव्ह आली. आता घराला कुलूप लावण्यात आलं आहे. या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिले की, करोना व्हायरसमुळे ती एका खोलीत एकटीच राहत असून कोणाशीही संपर्क करत नाही. तसेच ताप आणि थकवा ही तिची मुख्य लक्षणं आहेत. सर्वांनी काळजी घ्या आणि या विषाणूला गांभीर्याने घ्या. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या जेम्स बॉण्डच्या क्वांटम ऑफ सोलेस या सिनेमा ओल्गाने काम केलं होतं. एवढंच नाही तर २०१३ मध्ये तिने साय-फाय सिनेमा ऑब्लाइवियममध्येही काम केलं होतं.
दरम्यान जगातील ज्या मान्यवरांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे त्यामध्ये ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सनारो, अमेरिकन अभिनेत्री रिटा विल्सन, अमेरिकन अभिनेता टॉम हॅक्स, इंग्लिश फूटबॉलपटू , कॅलम हडसन-ओडोई, स्पेन संसदेतील खासदार आयरेन माँटेरो, कॅनडाच्या पंतप्रधानांची पत्नी सोफी गेग्रॉ ट्रूडो, प्रसिद्ध लेखक लुईस सप्लवेदा, इटॅलियन फूटबॉलपटू डॅनियल रुगानी, फ्रेंच बास्केटबॉल खेळाडू रुडी गोबर्ट, ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री पीटर डटन, अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू डोनोव्हन मिशेल, प्रसिद्ध कोलंबियन सायकलपटू फर्नांडो गेव्हिरिया, प्रसिद्ध रशियन सायकलपटू दिमित्री स्ट्रॅकोव्ह, फ्रान्समधील सांस्कृतिक मंत्री फ्रँक रिस्टर, ब्रिटीश खासदार नडिन डॉरिस, इराणच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या उपाध्यक्ष मसूमा टेकर आदींचा समावेश आहे.