Corona Virus Effect : महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, देशासाठी महत्वाचे आहेत ३० दिवस…

Sources: PM Narendra Modi had telephonic conversation with Maharashtra CM Uddhav Thackeray. They discussed the situation of #Coronavirus in the state and the measures regarding it. (file pics) pic.twitter.com/UjTVv38DBC
— ANI (@ANI) March 15, 2020
भारतात कोरोनाव्हायरस वेगाने पसरत असला तरी या धोकादायक विषाणूला रोखण्यासाठी सरकार वेगवान पावलेही उचलत आहे. कित्येक राज्यांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तर देशाच्या राजधानीसह काही राज्यात हा साथीचा रोग म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील ३० दिवसात कोरोनावर मत करण्याचे नियोजन केले जात आहे . सध्या कोरोना व्हायरस देशात दुसऱ्या टप्प्यात असल्याने पुढचे ३० दिवस देशासाठी खूप महत्वाचे ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे य़ांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून चर्चा केली.
या निमित्ताने एएनआय ने दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रभाव वाढू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई आणि यवतमाळमध्येसोबतच आता औरंगाबादमध्येही रुग्ण सापडल्याने राज्यातल्या कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. भारतातील कोरोना विषाणू सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे कोरोनाला तिसऱ्या टप्प्यात येण्यापासून रोखण्यासाठी भारताच्या हातात फक्त ३० दिवस आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यास आणि योग्य त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात अयशस्वी ठरल्यास भारतात हा विषाणू आणखी तीव्रतेने पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इंडियन मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक बलराम भार्गव यांनी, “भारतात Covid-19 सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे सध्या पदेशातून प्रवास केलेल्या लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. व्हायरसचा संसर्ग थांबविणे सध्या सरकारसाठी महत्त्वाचे आहे”, असे सांगत कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी भारताकडे ३० दिवस आहेत, असेही ते म्हणाला. या ३० दिवसात कोरोनाला रोखल्यास तो तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार नाही. चीनच्या वुहान शहरात सुरू झालेला कोरोना विषाणूची दहशत जगभरात पसरली आहे. भारतासह जगातील अन्य देशांमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण वाढत आहेत. चीनमध्ये या विषाणूमुळे हजारो लोकांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर इटली आणि इराणमध्येही दिवसेंदिवस परिस्थिती वाईट होत आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूमुळे चीन आणि इटलीमधील परिस्थिती सहाव्या टप्प्यात पोहोचली आहे. तर भारतात कोरोना सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे.