उन्नाव पीडित प्रकरण : भाजपच्या माजी आमदारांसह दोन पोलीस अधिकाऱ्यांसहित ७ जणांना १० वर्षाची शिक्षा आणि १० लाखाचा दंड

उत्तर प्रदेशच्या बहुचर्चित उन्नाव बलात्कार प्रकरणात दोषी असलेला भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंग सेंगर यांच्यासह ७ जणांना उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्या प्रकरणात आज कोर्टाने शिक्षा १० वर्षाची सुनावली आहे. यामध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने त्यांना १० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंडाची रक्कम पीडितेला देण्यात येईल, असेही कोर्टाने य़ावेळी सांगितले आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेशातील दोन पोलीस अधिकाऱ्यांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहेत. एक त्यावेळी माखी पोलीस ठाण्याचे एसएचओ होते, तर दुसरे त्यावेळी माखी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक होते.
शिक्षा झालेल्या दोषींमध्ये भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगर यांच्यासह तत्कालिन माखी ठाण्याचे सबइन्स्पेक्टर कामता प्रसाद, तत्कालिन माखी ठाणाचे एसएचओ अशो सिंह भदौरिया, विनय शर्मा, बीरेंद्र सिंह उर्फ बऊवा सिंह, शशी प्रताप सिंह उर्फ सुमन सिंह, जयदीप सिंह उर्फ अतुल सिंह यांनाही प्रत्येकी १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आयपीसी कलम ३०४, १२० ब , १६६ , १६७ ,१९३ , २०१ , २०३ , २११ , २१८ , ३२३ या कलमांवरून हि शिक्षा ठोठावण्यात आली. यापूर्वी अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याला तीस हजारी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. उत्तर प्रदेशातल्या सत्ताधारी आमदारानेच बलात्कार केल्याने प्रचंड वाद निर्माण झाला होता. उन्नाव इथे जून २०१८ मध्ये एका महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. हा बलात्कार कुलदीप सिंग सेंगरने केल्याचा आरोप पीडितेने केला होता. या प्रकरणात पोलिसांकडे सर्व पुरावे असतानाही अटक करण्यास टाळाटाळ केली गेली होती. तिच्या वडिलांच्या हत्या प्रकारांचा हा खटला लक्षात घेता अखेर अलाहाबाद हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर सेंगरला अटक केली होती.