Corona Virus Effect : “गो कोरोना गो..” नंतर आता रामदास आठवले यांची नवी कविता…

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या कविता नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा “गो करोना गो… गो करोना गो…. करोना गो… ” हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची ” गो महाविकास आघाडी गो ” हि घोषणाही गाजली आणि आता त्यांची कोरोनावरील नवीन कविता प्रसार माध्यमांमध्ये गाजत आहे. या कवितेत ते “करोनाचे बारा वाजणार..” असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांची हि कविताही चांगलीच गाजत आहे.
त्यांनी आपल्या नव्या कवितेत म्हटले आहे कि , ‘करोना गो ये मैने दिया था नारा, इसलिए जाग गया भारत सारा, करोना जैसा चमक रहा है ११० देशों में तारा, एक दिन हम बजायेंगे करोना के बारा,’ अशी नवी कविता रामदास आठवले यांनी केली आहे. या कवितेतून करोना गेला पाहिजे असं सांगतानाच आपल्या गो करोनाच्या घोषणेमुळे मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली असल्याचं त्यांना कवितेतून सांगायचं आहे. शिवाय या महाभयंकर आजाराने ११० देशांमध्ये हातपाय पसरल्याचं सांगत या आजाराचं गांभीर्यही त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला असून शेवटी करोनाचा आपण सर्व मिळून मुकाबला करणारच आणि शेवटी आपलाच विजय होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्ते केला आहे. प्रसारमाध्यमांना ही कविता ऐकवतानाच करोना गेलाच पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.