राज्यसभा : एनपीआर मध्ये विचारले जाणारे सर्व प्रश्न ऐच्छिक , डाउटफुल ‘D’ वर अमित शहा यांनी केला “हा” खुलासा …

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत बोलताना अनेक खुलासे केले . या निमित्ताने त्यांनी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला अनेक राज्यांमधून विरोध होतोय. एनपीआर वेळी कागदपत्र मागितले जातील, अशी नागरिकांमध्ये भीती आहे. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकांमधील हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. एनपीआरला घाबरण्याची गरज नाही. यात डाउटफुलचा ‘डी’ लागणार नाही, असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं.
Union Home Minister Amit Shah in Rajya Sabha: I am again repeating that no documents will be needed for National Population Register (NPR). All the information asked is optional. Nobody has to fear from the process of NPR. There will be no 'D' (doubtful) category. https://t.co/aAUn91HYG8
— ANI (@ANI) March 12, 2020
अमित शहांनी राज्यसभेत ईशान्य दिल्लीतील दंगलीवरीळ चर्चेलाही उत्तर दिले. ते म्हणले कि , सीएए आल्यानंतर द्वेषपूर्ण वक्तव्यं केली गेली. तुमचं नागरिकत्व जाणार असं देशातील मुस्लिमांच्या मनात भरवलं गेलं. पण सीएएद्वारे नागरिकत्व दिलं जातं ते काढून घेतलं जात नाही. सीएएमध्ये नागरिकत्व काढून घेण्याचा कुठलाही नियम नाही. सर्वच राजकीय पक्षांनी हे नागरिकांना सांगितलं पाहिजे, असं अमित शहा म्हणाले.
अमित शहा यांच्या खुलाशावर बोलताना कपिल सिब्बल म्हणाले , सीएएमुळे नागरिकत्व काढून घेतले जाईल, असं कुणीही म्हणत नाही. पण राष्ट्रीय लोकसंख्या पुस्तक (NPR)वेळी नागरिकांना १० प्रश्न विचारले जाणार आहेत. मग त्यानंतर त्यात काही उणीवा आढळल्यास त्यावर डाउटफुल ‘D’ हा शेरा मारला जाणार आहे. यामुळे फक्त मुस्लिमांचेच नाही तर गरीबांचे नागरिकत्व काढून घेतले जाईल, या मुद्द्यावर शहांनी कपिल सिब्बल यांना उत्तर दिलं. काँग्रेसमधील अनेक नेते सीएए मुस्लीम विरोधी आहे, असं बोलताहेत. किती जणांची वक्तव्य दाखवू तुम्हाला, असं शहांनी सिब्बल यांना ऐकवलं. त्याच बरोबर ते म्हणाले कि , एनपीआरसाठी कोणतीच कागदपत्रं मागितली जाणार नाहीत. तसंच कुठलाही ‘D’ लावला जाणार नाही. सर्व माहिती ऐच्छीक असेल. यामुळे लोकसंख्या नोंदणीदरम्यान कुणी भीती बाळगण्याची गरज नाही, असा विश्वास अमित शहा यांनी दिला.
दरम्यान राज्यसभेत दिल्ली दंगलीवर चर्चेदरम्यान काँग्रेस पक्षाने मोदी सरकार कडाडून टीका केली. चर्चेदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनाही मोदी सरकावर हल्लाबोल केला. दिल्लीतील दंगल म्हणजे लोकांवर झालेला व्हायरसचा अटॅक असल्याचे म्हणत सिब्बल यांनी सभागृहात उपस्थित गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही हल्लाबोल केला. सिब्बल यांनी राज्यसभेत बोलताना दिल्ली दंगलीची तुलना बालाकोटमधील सर्जिकल स्टाइकशी केली. दिल्लीची दंगल ही दिल्लीतील लोकांवर सर्जिकल स्ट्राइक केल्यासारखीच आहे, असे सिब्बल म्हणाले. जो व्हायरस तुम्ही पसरवत आहात, त्यावरील उपचार आम्हीच आहोत, असा टोलाही सिब्बल यांनी केंद्र सरकार आणि भाजपला लगावला.