Aurangabad Crime : सुरत गुन्हेशाखेला वाॅंटेड असलेला खूनी, पुंडलिकनगर पोलिसांनी केला जेरबंद

औरंगाबाद – सुरत गुन्हेशाखा शोध घेत असलेला खुनी पुंडलिकनगर पोलिसांनी बीड बायपासवरील राधाकृष्ण नगरातून पकडून गुरुवारी गुजराथ पोलिसांच्या हवाली केला.
कमलेश सूर्यवंशी उर्फ अमोल मंगूभाई (२४) रा.जळगाव हल्ली मु. दिंडोली सुरत धंदा ड्रायव्हर असे अटक आरोपीचे नाव आहे. सुरंत गुन्हेशाखेला कमलेश सूर्यवंशी एका खून प्रकरणात हवा होता.त्याचे मोबाईल लोकेशन औरंगाबाद दाखवले जात होते. त्यानुसार आरोपीचे मोबाईल लोकेशन पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत होते.म्हणून गुजराथ पोलिसांनी चार दिवसांपूर्वी एपीआय घन्नशाम सोनवणे यांच्याशी संपर्क केला होता, त्यानुसार पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपी सूर्यवंशी ला मुकुंदवाडी परिसरातील वरील शिवशाही नगरातून ताब्यात घेतले.व सुरंत पोलिसांना संपर्क करंत आरोपी त्यांच्या हवाली करण्याची तयारी दर्शवली. दरम्यान कमलेश हा औरंगाबादेतील त्याचा काका रमेश सूर्यवंशीकडे थांबलेला पोलिसांना आढळला.गुरुवारी सुरत गुन्हेशाखा पोलिसांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्षात येत आरोपीला ताब्यात घेतले.वरील कारवाई एपीआय घन्नशाम सोनवणे पीएसआय प्रभाकर सोनवणे,पोलिस कर्मचारी रमेश सांगळे,बाळाराम चौरे , शिवाजी गायकवाड, प्रविण यदमळ,प्रविण मुळे यांनी पार पाडली.वरील कारवाईचे पोलिसउपायुक्त झोन दोन यांनी कौतूक केले.