Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मध्य प्रदेशातील राजकीय उलथा-पालथ , ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर कठोर शब्दात टीकास्त्र, काँग्रेसचे १९ आमदार कर्नाटकात…

Spread the love

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पक्ष त्यागामुळे मध्य प्रदेशात मोठी राजकीय उलथापालथ होत असून ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असला तरी काँग्रेसने मात्र आपण त्यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर ज्योतिरादित्यांवर काँग्रेसनेते भडकले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या या कृतीवरून त्यांच्यावर काँग्रेस नेत्यांकडून कठोर शब्दात “गद्दार” आणि  “जयचंद”  अशा शब्दात टीका केली जात आहे. दरम्यान मध्यप्रदेशातील काँग्रेसचे १९ आमदार कर्नाटकात मुक्कामाला असून त्यांनी संरक्षणाची मागणी केली आहे. आम्ही आपल्या मर्जीने आलो असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामध्ये सहा मंत्र्यांचा समावेश आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्या सरकारमधील सहा मंत्र्यांना पदावरून काढून टाकण्याचे पत्र राज्यपालांना दिले आहे. यामध्ये इमरती देवी, तुलसी सिलवर, गोविंदसिंह राजपूत, महेंद्रसिंह सिसोदिया, प्रद्युमनसिंह तोमर, आणि डॉ. प्रभुराम चौधरी यांचा समवेश आहे. हे सहा मंत्री बंडखोर आमदारांसोबत कर्नाटकात आश्रयासाठी गेले आहेत.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीसाठी काँग्रेसचे नेते दिग्दविजय सिंह, जीतू पटवारी, बाला बच्चन, सज्जन सिंह वर्मा, सुरेंद्र सिंह बघेल आणि इतर काही नेते हजर आहेत. भाजपच्या भूमिकेवर टीका करताना काँग्रेसनेते दिग्विजय सिंह यांनी  , कमलनाथ सरकारने माफियांविरुद्ध कारवाई केल्यानं मध्यप्रदेशचा जनादेश उलटून टाकत कमलनाथ यांच्याविरुद्ध भाजपचा कट… काँग्रेसच्या आमदारांना बंगळुरू घेऊन जाणारे त्या तीन चार्टर्ड विमानांची व्यवस्था भाजपकडून करण्यात आली होती, याचे पुरावे आमच्याकडे असल्याचे म्हटले आहे. तर भाजपनेत्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आत्या यशोधरा शिंदे यांनी त्यांचे भाजपध्ये स्वागत केले आहे.

काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचा उल्लेख गद्दार असा केला आहे. पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला हे फार बरे झाले अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी टीका करताना व्यक्त केली आहे. मात्र, ज्योतिरादित्यांच्या राजीनाम्यानंतर आता मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार टिकणार नाही असेही चौधरी यांनी मान्य केले. जे पक्षाच्या विरोधात गद्दारी करतात त्यांची हकालपट्टी करावीच लागेल, असे चौधरी यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्ष आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या पक्षाला जर तुम्ही बळ देणार असाल तर पक्षाला त्या विरोधात कारवाई ही करावीच लागेल, असेही ते पुढे म्हणाले. जेव्हा पक्ष कठीण काळात असतो तेव्हा तशा परिस्थिती पक्षाला सोडून जाणे ही बेईमानी आहे, अशा शब्दात चौधरी यांनी ज्योतिरादित्यांना टोला हाणला आहे. या मुळे पक्षाचे नुकसान होणारच आहे. कदाचित मध्य प्रदेशातील आमचे सरकार आता वाचणार नाही असे सांगताना विरोधी पक्षाला फोडणे हीच भारतीय जनता पक्षाचे राजकारण असल्याची टीकाही चौधरी यांनी केलीय.

दरम्यान राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मात्र मध्य प्रदेशचा राजकीय पेच लवकरच सुटेल, अशी आशा व्यक्त केलीय. ‘मला आशा आहे की मध्यप्रदेशवर घोंघावणारं राजकीय संकट लवकरच संपुष्टात येईल. सर्व नेते मतभेदांना दूर सारण्यात यशस्वी होतील. निवडणुकीत दिलेल्या वचनांना पूर्ण करण्यासाठी राज्याला एका स्थिर सरकारची गरज आहे’ असं सचिन पायलट यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे सोमवारी दिल्लीतील आपल्या  घरी पोहचण्याअगोदर ज्योतिरादित्य यांनी राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची भेट घेतली होती. त्यामुळे सचिन पायलट यांचीही चर्चा होत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!