अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यासाठी निघाले, जाणून घ्या दोन दिवसांचे कार्यक्रम….

US President Donald Trump along with First Lady Melania Trump depart from Andrews Air Force Base for a two day visit to India. President Trump will attend the 'Namaste Trump' event at Motera Stadium in Ahmedabad, tomorrow. pic.twitter.com/4WpBfP2YM6
— ANI (@ANI) February 23, 2020
नियोजित कार्यक्रमानुसार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या दोन दिवसीय भारत दौऱ्यावर निघाले आहेत. अमेरिकेच्या अँड्र्यू एअर फोर्स तळावरून त्यांच्या विमानाने उड्डाण घेतले आहे. त्यांचे विमान उद्या सकाळी ११.४० पर्यंत अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल. ट्रम्प यांच्यासोबत पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनरही येत आहेत. गृहमंत्रालयाने घोषित केलेला त्यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
सकाळी ११.४० वाजता
– अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे अहमदाबाद विमानतळावर आगमन.
दुपारी १२.१५ वाजता
– अहमदाबादमधील साबरमती आश्रमाला भेट.
दुपारी १.०५ वाजता
– मोटेरा स्टेडियममधील ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमात सहभाग.
दुपारी ३.३० वाजता
– आग्र्याला रवाना होणार
संध्याकाळी ४.४५ वाजता
– आग्रा विमानतळावर आगमन.
संध्याकाळी ५.१५ वाजता
– जगप्रसिद्ध ताजमहालला भेट.
संध्याकाळी ६.४५
– दिल्लीला रवाना.
संध्याकाळी ७.३० वाजता
– दिल्लीच्या पालम विमानतळावर आगमन.
मंगळवार, २५ फेब्रुवारी
सकाळी १० वाजता
– राष्ट्रपती भवनात स्वागत.
सकाळी १०.३० वाजता
– राजघाटः महात्मा गांधीच्या समाधीवर आदरांजली.
सकाळी ११ वाजता
– पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत हैदराबाद हाउसमध्ये बैठक .
दुपारी १२.४० वाजता
– हैदराबाद हाउसमध्ये पत्रकार परिषद.
संध्याकाळी ७.३० वाजता
– राष्ट्रपती भवनला जाणार. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत बैठक करणार
रात्री १० वाजता
– अमेरिकेला रवाना होणार