थरारक : प्रेमात आंधळ्या झालेल्या मुलीनेच केला प्रियकराच्या मदतीने पोलीस आईच “गेम ” !!

उत्तर प्रदेशमध्ये याच दिवशी माय -लेकीच्या प्रेमाला काळीमा फासणारी एक घटना घडली. दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. आंधळ्या प्रेमात वेड्या झालेल्या मुलीने थेट आपल्या आईचीच हत्या केली. या घटनेने गाझियाबाद शहर हादरले आहे. दिल्लीतील बृजविहार पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या हवालदार शशी शुक्ला यांच्या विरोधात त्यांच्या मुलीनेच खुनाचा कट रचला. शशी शुक्ला यांच्या अल्पवयीन मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या आईचाच “गेम” केला.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागचे कारण असे कि , मुलीच्या प्रेमाला आईचा विरोध होता. शशी शुक्ला यांना आपल्या मुलीचा प्रियकर पसंत नव्हता. त्यामुळं त्याला भेटण्यासाठी शशी यांनी मज्जाव केला होता. याच रागातून आंधळ्या प्रेमात वेड्या झालेल्या या लेकीनं आपल्या आईची हत्या केली. या हत्येनंतर पोलीसही धास्तावले आहेत.
या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर, पोलिसांना पहिली शंका मुलीवर आली. पोलिसांनी जेव्हा अल्पवयीन मुलीची काटेकोरपणे चौकशी केली तेव्हा तीने सत्य सांगितले आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. असे सांगितले जात आहे की, महिला पोलीस आपल्या मुलीला प्रेयकराला भेटू देत नव्हती. यावरून त्यांच्यात कायम वाद होत होते. म्हणूनच आईचा काटा काढण्यासाठी शशी यांच्या मुलीने आपल्या प्रियकरासोबत प्लॅन आखला आणि आईचाच गेम केला. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.