सेव्ह सुमित! हृदयाचे दोन्ही व्हॉल्व निकामी , पुढील उपचारासाठी नागपूरला दाखल, मित्रपरिवाराकडून आर्थिक मदतीचे आवाहन

सुमितला मदत करण्यासाठी
स्टेट बॅंक ऑफ इंडिया, खाते क्रमांक 32754162398
आयएफएससी क्रमांक SBIN 0012712
आमच्या मित्राला आर्थिक सहकार्य करा!
सुमितच्या हृदयाचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिल्याने त्याचे सहकारी मित्र त्याला मानसिक, आर्थिक पाठबळ देत आहे. शासनाच्या योजनाही आहे प्रयत्नही केले परंतु त्या सहजासहजी योग्य वेळेत मिळत नाही. जी काही तुटपूंजी जमापूंजी होती ती रोगनिदान करण्यामध्येच गेली. नागपूरसारख्या शहरात निघेल त्या ओळखीने मिळेल ती मदत घेणे सुरू आहे. अत्यंत मनमिळावू स्वभावाचा, नेहमी कुणालाही मदत करणा:या सुमितला आज तुमची मदत हवी आहे. जमेल ती आर्थीक मदत करून सुमितला सुंदर आयुष्याची स्वप्रे पाहण्यास पाठबळ द्यावे असे आवाहन भावी पत्रकारमित्र गिरीष नागदिवे, अंकुश सहारे, प्रभुदयाल कुरवाडे, किर्ती इंदुरकर, ऋतूराज आठवले, बादल वैद्य, पवन कैथवास, आदर्श लांडे, प्रियंका सुरोशे, वैभव पुंडकर, प्रफुल वानखडे, शिवानी ठाकूर, कोमल इंगळे, शिवानी बावणे, अश£ेषा गणोस्कर, तनुश्री किरक्टे, प्रतिक साबळे, नितीन इंगळे, महेश चव्हाण, विक्की बाभूळकर, रोहन गुडथे, प्रज्वल खोब्रागडे, कुणाल पुनसे, प्रणिता टेंभरे, जितेंद्र कांबळे, सागर तायडे, सुशिल वानखडे, कासिफ चाऊस, नितीन साबळे, आदिल खान यांनी केले आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात शिक्षण घेऊन समाजात स्वत:चे अस्तित्व निर्माण करून उज्वल भविष्याचे स्वप्र पाहणा:या सुमितचे वयाच्या २६ व्या वर्षी हृदयाचे दोन्ही व्हॉल्व निकामी झाले. सुमितला बूब हॉस्पिटल ते इर्विन आणि संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल असा या आठ दिवसात ऐन परिक्षेच्या काळात प्रवास घडला. सर्व तपासण्या झाल्यावर हृदयाचे दोन्ही व्हॉल्व बसवावे लागणार आणि त्याला आवाक्याबाहेर खर्च येणार हे कळताच पत्रकारितेच्या विद्यार्थी मित्रांनी ‘सेव्ह सुमित’ नावाचे कँम्पेन सुरू केले. सर्व मित्रांनी जमेल ती मदत ‘लाईफलाईन’ फंडच्या माध्यमातून गोळा करण्याचा मानस व्यक्त केला. याच माध्यमातून जमेल ती मदत समाजातील नागरिकांनी करावी असे आवाहन ‘लाईफलाईन’ ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.
सुमित गणेशराव गांजरे हा भातकुली तालुक्यातील बहाद्दरपूर येथील शेतकरी कुटूंबातील सर्वसामान्य जीवन जगणारा युवक. सकाळी कॉलेज आणि दुपारी मिळेल ते इलेक्ट्रिक फिटींग करून आई-वडीलांना आधार देत महाविद्यालयातील विविध उपक्रमात नेहमी पुढाकार घेऊन आपले कतृत्व निर्माण करण्यासाठी धडपडत असतो. सुमितला मदत करण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडिया, खाते क्रमांक ३२७५४१६२३९८, आयएफएससी क्रमांक एस.बी.आय.एन. ००१२७१२ वर जमेल ती मदत करण्याचे आवाहन प्रा. विलास फरकाडे, प्रा.अमित त्रिवेदी, प्रा. शिल्पा देशपांडे, आकाशी सरवटकर, प्रा. विकास राठोडसह विद्याथ्र्यांनी नागरिकांना केली आहे.
काही वर्षाअगोदर त्याच्या आईचा अपघात झाला होता. तेव्हा त्याच्या आईच्या मेंदूला जबर मार लागला होता. तरीपण सुमितने हार न मानता आईवर उपचार केले. या संकटातून तो सावरत नाही तर त्याच्यावर दुसरे संकट ओढविले. पत्रकारितेच्या क्षेत्रात बी.ए.जे.एम.सी प्रथम वर्षाला असतांनाच अचानक त्याची छाती दुखू लागली. त्याला विभागातील प्राध्यापक व विद्याथ्र्यांनी सुरूवातीला राठी नगर येथील डॉ. बुब यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले. डॉ. बुब यांनी इर्विन हॉस्पिटलला नेण्याचा सल्ला दिला. तिथे शल्यचिकीत्सक डॉ. श्यामसुदर निकम यांच्या मार्गदर्शनात इसीजी, इको, रक्ततपासणी करून त्याचे दोन्ही व्हॉल्व निकामी झाले असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला संत अच्युत्य महाराज हार्ट हॉस्पिटल येथे नेण्यात आले. तीथे त्याला आयसीयूत ठेऊन शेवटी ऑपरेशन करावे लागणार सोबतच अजून काही तपासण्या ज्यामध्ये सिटी स्कॅन, अँन्जिओग्राफी करण्याचा सल्ला दिला. सुमितचा खर्च सरकारी योजनेतून व्हावा यासाठी महात्मा फुले आरोग्य योजनेत नोंदणी करण्यात आली परंतु अद्यापही अॅपु्रवल आले नाही. तपासण्यांमध्येच २० ते ३० हजार रूपये निघून गेले. शेवटी संत अच्युत्य महाराज हार्ट हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी येथे सोय होणार नाही व त्याला नागपूर येथे मेडीकलला नेण्याचा सल्ला दिला. सुमित गेले दोन दिवस नागपूर येथे असून त्याच्यावर ऑपरेशन करण्याच तेथेही सल्ला देण्यात आला. त्याचे दोन्ही व्हॉल्व निकामी झाल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सुमित सांगतो.
पत्रकारितेचे सर्व विद्याथ्र्यांसह प्राध्यापक, त्याचा मोठा भाऊ, वहिणी, आई-वडील, नातेवार्ईक जमेल ती मदत देण्याचा प्रयत्न करित आहे. त्याच्यावर खाजगी रूग्णालयात संपूर्ण बरा होईपर्यंत अंदाजे ५ ते ६ लाख असा खर्च येईल असे डॉक्टरांनी सांगितले. आर्थिक स्थिती जमेची असल्याने त्याला खासगी रूग्णालयात उपचार करणे शक्य नाही. त्याला मोठा भाऊ असून त्याच्यावरच सर्वांची जवाबदारी आल्याने पुढील पैसे गोळा करण्यास त्याला सर्वांच्या मदतीची अपेक्षा आहे. नागपूर येथे त्याच्या विविध तपासण्या होत असून त्याला तिथे खर्च जरी कमी येत असला तरी पूर्वतपासण्यांमध्येच जी काही सेव्हींग होती ती निघून गेली. समाजातील दानदात्यांनी जमेल ती आर्थिक मदत करून सुमितला वाचविण्याचे आवाहन लाईफलाईन ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ९९२२६२९८४५, ९३२५९८६६७९ वर संपर्क साधून केलेल्या मदतीचे स्क्रीनशॉट वरील क्रमांकावर पाठवू शकता. ‘फोन पे’ च्या माध्यमातून मदत ९९२२६२९८४५ या क्रमांकावर पाठवू शकता.