दिल्लीत महिला पोलीस उपनिरीक्षकाची गोळी घालून हत्या

As per the Police, Sub-Inspector Preeti was walking from Rohini East Metro Station to her home at 9.30 PM, when an unidentified person came, took out a pistol&shot her in her head. She died at the spot.
Police have collected CCTV footage from the area&are examining it. #Delhi https://t.co/0nB0uayQrS
— ANI (@ANI) February 7, 2020
दिल्लीमधील रोहिणी परिसरात काल रात्री शुक्रवारी साधारण रात्री ९.३० वाजता एका महिला सब-इन्सपेक्टरची गोळी घालून हत्या करण्यात आली. प्रीती ही महिला सब-इन्सपेक्टर दिल्लीतील पटपडंगंज इंडस्ट्रियल भागात तैनात होती. रात्रीच्या वेळी ती आपली ड्यूटी पूर्ण करून रोहिणी मेट्रो स्टेशन पोहोचली. तपासाअंती आलेल्या माहितीनुसार पीएसआय दीपांशू यांनी प्रीतीची गोळी घालून हत्या करून त्याने स्वत:ही त्याच पिस्तुलाने स्वतःवर गोळी घालून आत्महत्या केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१८ मध्ये हे दोघेही एकत्र दिल्ली पोलिसात रुजू झाले होते. शिवाय हे दोघे बॅचमेट होते. या हत्येमागील नेमक्या कारणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून केला जात आहे. दिल्लीमधील रोहिणी परिसरात काल रात्री शुक्रवारी साधारण रात्री ९.३० दरम्यान एका महिला सब-इन्सपेक्टरची गोळी घालून हत्या करण्यात आली. प्रीती ही महिला सब-इन्स्पेक्टर दिल्लीतील पटपडंगंज इंडस्ट्रियल भागात तैनात होती. रात्रीच्या वेळी ती आपली ड्यूटी पूर्ण करून रोहिणी मेट्रो स्टेशन येथे पोहोचली आणि त्यानंतर मेट्रो स्टेशनहून आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. प्रीती स्टेशनपासून साधारण ५० मीटर अंतरावर पोहोचली असेल, त्याचवेळी मागून एक तरुण आला व त्याने प्रीतीवर तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी प्रीतीच्या शेजारुन गेलेल्या एका कारच्या आरशावर लागली. तर एक गोळी प्रीतीच्या डोक्याला लागली. आणि तेथेच तिचा मृत्यू झाला. लागलीच मारेकरी तेथून फरार झाला.
सदर घटना घडल्यानंतर घटनास्थळी असलेल्या एकाने पोलिसांना ११२ वर कॉल करुन याबाबतची माहिती दिली. यानंतर तातडीने फॉरेंसिक टीमलाही तिथे पाचारण करण्यात आले. या घटनेच्या पुढील तपासात दिल्ली पोलिसातील जीएस पीएसआय दीपांशू यांनीच प्रीतीवर गोळी झाडल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर काही वेळातच त्यांनी त्याच पिस्टलने स्वत:वर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली. कर्नाल येथील एका गाडीत त्यांचा मृतदेह सापडला. 2018 मध्ये दोघेही दिल्ली पोलिसात रुजू झाले होते. दोघेही बॅचमेट होते. सध्या पोलीस या हत्येमागचा तपास घेत आहेत.