पोलिसांच्या वाहनावर धडकून झालेलया कार अपघातात पिता-पूत्र ठार

पूर्व द्रुतगती महामार्गावर उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनाला भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटल्याने इको कारचालकाने मंगळवारी मध्यरात्री जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये कारचालक आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला.याप्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कारचालक सचिन ढमाले (३८) आणि त्याचे वडील विष्णू ढमाले (६२) अशी अपघातात ठार झालेल्यांची नवे आहेत. यामध्ये कारमध्ये बसलेले सात अन्य प्रवासी जखमी झाले. ढमाले पुतापुत्र सायन ॲन्टाॅपहिल येथील रहिवाशी आहेत.
पूर्व द्रूतगती महामार्गावर रमाबाई आंबेडकर नगरजवळ पंतनगर पोलिसांची टाटा सुमो कार रस्त्याच्या कडेला उभी होती. मध्यरात्री एकच्या सुमारास इको कार भरधाव वेगाने आली आणि पोलिसांच्या गाडीला धडकली. कार वेगात असल्याने ही धडक इतकी जोरदार होती की पोलिसांच्या गाडीचे नुकसान झाले.