संघ दहशतवादी , . आरएसएसवर बंदी घाला, माझ्याकडे पुरावे आहेत , राजरत्न आंबेडकर यांची संघावर टीका

#WATCH Rajaratna Ambedkar, Dr BR Ambedkar's great-grandson, in K'taka: …I'd said RSS is India's terrorist org,get it banned…A sadhvi sits beside PM&says that when Indian Army exhausted its arms&ammunition,RSS provided them that. How did RSS get that arms&ammunition?…(26.01) pic.twitter.com/PMmtLX2afc
— ANI (@ANI) January 27, 2020
राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना भारतातली दहशतवादी संघटना असून माझ्याकडे यासंबंधीचे पुरावे असल्याचा गंभीर आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकरांनी केले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानं एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नाही तर, राजरत्न आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणावी अशी मागणीही केली आहे.
दरम्यान राजरत्न आंबेडकर यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये राजरत्न संघावर हल्ला चढवताना दिसत आहेत. ‘तुम्ही लोकांनी माझा पाकिस्तानातील व्हिडिओ पाहिलाच असेल. आरएसएस ही भारतातील दहशतवादी संघटना आहे हे मी तिथे म्हणालो होतो. आरएसएसवर बंदी घाला, माझ्याकडे पुरावे आहेत,’ असं म्हणाता ते या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींशेजारी बसलेली साध्वी मुलाखतीत सांगते की, भारतीय सैन्याजवळील दारूगोळा संपला, बंदुका, स्फोटकं संपली; तेव्हा आरएसएसनं स्फोटकं, दारुगोळा, बंदुका, बॉम्ब भारतीय सैन्याला पुरवले होते,’, असंही ते या व्हिडिओमध्ये बोलत आहेत.
राजरत्न आंबेडकर यांनी संघावर काही प्रश्न उपस्थित करताना म्हटले आहे कि, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात बॉम्ब आले कुठून? इतका दारुगोळा कुठून आला? बंदुका कुठून आल्या?, असा प्रश्नही राजरत्न आंबेडकरांनी उपस्थित केला. पंतप्रधानांच्या बाजूला बसून या साध्वी असं वक्तव्य करतात. ज्या घरांमध्ये दारुगोळा सापडला, ती घरे किंवा त्या घरांमधील मुलं-माणसांना दहशतवादी म्हणणार नाहीत काय? ज्या संघटनेकडे इतक्या मोठ्या प्रमाणात दारूगोळा आहे ती संघटना दहशतवादी नाही का? या संघटनेचं लोक दहशतवादी कारवायांमध्ये पकडले जात आहेत. अशा संघटनांवर जगात बंदी घालण्यात यावी. ते काम आम्ही करत आहोत, असंही राजरत्न म्हणाले.