Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नागपुरात तरुणीवर पाशवी अत्याचार , बलात्कारानंतर केले हे क्रूर कृत्य…

Advertisements
Advertisements
Spread the love

नागपूरच्या पारडी परिसरात १९ वर्षीय तरुणीवर ५२ वर्षीय नराधमांनं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कामठी गॅंगरेपची घटना ताजी असतानाच, बलात्काराची ही धक्कादायक घटना पुढे आली आहे. त्यामुळे नागपुरात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिचा भाऊ पारडीतील एका कंपनीत  काम करतात. याच कंपनीमध्ये आरोपी  योगीलाल रहांगडाले हा सुपरवाझर म्हणून काम करीत होता. कंपनी लगत असलेल्या एका खोलीत पीडित आणि तिचा भाऊ राहत होता. २१ जानेवारी पीडितेचा भाऊ गावी गेला होता. ती एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने मध्यरात्री आरोपी रहांगडले खोलीत आला. पीडित तरुणीने त्याचा विरोध केला होता, पण त्याने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध केलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले.  हा नराधमाचे कृत्य एवढ्यावरच थांबले नाही. त्याने पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकून अमानुष अत्याचार केला. सकाळी शुद्धीवर आल्यानंतर पीडित तरुणीने आरडाओरडा करून मदतीसाठी कर्मचाऱ्यांना आवाज दिला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडितेच्या तक्रारीनंतर पारडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पारडी परिसरात २१ तारखेला बलात्काराची ही घटना घडली. पण पीडितेनं तीन दिवसांनी त्याची तक्रार दाखल केली, अशी माहिती पारडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनील चव्हाण यांनी दिली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!