कॉलगर्ल म्हणून बोलावलेली आणि स्कार्फ बांधून आलेली जेंव्हा त्याची पत्नीचं बेनकाब झाली…

उत्तराखंडच्या काशीपूरमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्राच्या अमरावती येथेही घडली आहे.या घटनेत पत्नी मैत्रिणीच्या लग्नात जाण्याचा बहाना करून घराबाहेर गेलेली पत्नी घरी नसल्याची संधी साधून पतीने कॉलगर्लला फोन केला. पण जेव्हा हा पती तिला भेटायला गेला तेव्हा ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची पत्नीच निघाली आणि त्याच्या पायाखालची वाळू तर सरकालीच पण त्यानंतर संतापलेल्या पती-पत्नीची रस्त्यावरच हाणामारी सुरु झाली शेवटी पत्नीने घटनास्थळावरून पळ काढला आणि दोघांमध्ये दुरावा झाला.
या प्रकराची अधिक माहिती अशी कि , अमरावती येथील एका उच्चभ्रू वस्तीत हे पती -पत्नी गुण्यागोविंदाने संसार सुरू होता. मात्र, बुधवारी २२ जानेवारी दोघांच्याही दृष्टीने हि धक्कादायक घटना घडली बुधवारच्या दिवशी पत्नीने मैत्रिणीच्या लग्नात जायचे आहे, सायंकाळपर्यंत परत येईल असं सांगून घराबाहेर निघून गेली. पत्नी घराबाहेर जाताच पतीने आपल्या मित्राला कॉल करून कालगर्लचा नंबर मागितला. पतीने कॉलगर्लला आपल्या नियमित मोबाईलवरून कॉल केला. कॉल गर्लने तो कॉल स्वीकारून भेटीचे ठिकाण ठरविले आणि त्यानंतर थोड्याच वेळात कॉलगर्लचा फोन आला निश्चित कुठे यावं याबाबत विचारणा करत होती. तिला पत्ता माहित नसावा असे समजून पतीने शहरातील राठीनगर येथील एका ठिकाणी भेटण्यासाठी बोलावलं.
“त्याने ” व्हॉट्सअॅपवरून “कॉल गर्ल ” ची मागणी केली आणि पुढे जे झाले ते तुम्ही पहाच….
दरम्यान वर्दळीच्या ठिकाणी दोघेही पोहोचले एकमेकांचा शोध सुरू झाला स्कार्फ बांधून उभी असलेली महिला फोनवर बोलताना पाहून पतीदेव तिच्याजवळ पोहोचला आणि काय आश्चर्य कॉलगर्ल म्हणून आलेली ती महिलाच चक्क त्याची पत्नी निघाली. आता पत्नीचे बिंग फुटताच दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. आपली पत्नीच कॉलगर्ल निघाल्यामुळे पतीचा चांगलाच पारा चढला. तर आपला पती आपल्या माघारी असे कृत्य करतो हे कळल्यावर पत्नीही संतप्त झाली. त्यानंतर दोघांमध्ये रस्त्यावरच कडाक्याचे भांडण सुरू झाले. एवढंच नव्हे तर संतापलेल्या पतीने भररस्त्यावर दोघांनीही एकमेकांना बदडण्यास सुरुवात केली. त्यानंतर बघ्यांची चांगलीच गर्दी झाली परंतु पती-पत्नीचे भांडण म्हणून कुणीही त्यांच्यामध्ये पडायला तयार नव्हते. पण त्यांच्या भांडणातूनच खरा प्रकार उघडकीस आला आणि दोघेही तेथून निघून गेले. विशेष म्हणजे कॉल गर्ल म्हणून ज्या महिलेला फोन लावला तो नंबर वेगळा होता. तर नवीन मोबाईलमध्ये पतीचा नंबर सेव्ह नव्हता. त्यामुळे शेवटपर्यंत दोघांनीही एकमेकांना ओळखलं नाही.