“त्याने ” व्हॉट्सअॅपवरून “कॉल गर्ल ” ची मागणी केली आणि पुढे जे झाले ते तुम्ही पहाच….

कुठून कधी काय बातमी येईल आणि बातमीचा विषय काय असेल याची खात्री देता येत नाही. उत्तराखंडमधील काशीपूरमध्ये असा एक एक धक्कादायक प्रकार समोर आला कि , हा प्रकार वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. त्याचे झाले असे कि , येथील एका व्यक्तीने व्हॉट्सअॅप नंबरवर फोन करुन बोलवलेली कॉलगर्ल ही त्याची पत्नीच निघाली आणि त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. दोघांनाही एकमेकांना समोरासमोर पहिले आणि सुरु झाली दोघांमध्येही हाणामारी. अखेर दोघांनीही पोलीस ठाणे गाठून एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील दांपत्याचे वर्षभरापूर्वीच लग्न झालं आहे. मात्र लग्नानंतर या दोघांमध्ये अनेकदा लहान लहान कारणांवरुन भांडणे होऊ लागले. सततच्या भांडणाला कंटाळून पत्नीने माहेरी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. ही महिला काशीपूरमधील आयटीआय परिसरातील आपल्या आई-वडीलांच्या घरीच राहत होती. अगदी कधीतरी ती सासरी जाऊन परत येत असे. दरम्यान या महिलेचे आणि तिच्या मैत्रिणीचे काही कारणावरुन भांडण झाले आणि या रागातून सदर महिलेच्या मैत्रिणीने तिच्या पतीला “तुझी बायको कॉलगर्ल म्हणून काम करते,” अशी माहिती दिली. परंतु त्याचा विश्वास बसला नाही अखेर त्याची खात्री पटविण्यासाठी व्हाट्सऍपवरून कॉल गर्ल पुरविणाऱ्या महिलेचा क्रमांक तिच्या पाटील दिला. आणि तुम्हीच खात्री करून घ्या असे सांगितले.
दरम्यान हि माहिती मिळताच बेचैन झालेल्या पतीने पत्नीच्या मैत्रिणीने दिलेल्या क्रमांकावर व्हाट्सऍपवरून कॉल करुन कॉलगर्लसंदर्भात चौकशी केली आणि काही महिलांचे फोटो पाठविण्यास सांगितले. त्यानुसार फोन ठेवल्यानंतर त्याला व्हॉट्सअॅपवर काही महिलांचे फोटो मिळाले. “यापैकी हवी ती निवडा आणि पत्ता पाठवा” असा मॅसेज त्या महिलेने या व्यक्तीला केला तेंव्हा या फोटोमध्ये त्याच्या पत्नीचाही फोटो होताच. त्यानुसार त्याने आपल्या पत्नीचाच फोटो निवडून भेटीचे ठिकाण कळविले. ठरल्याप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी कॉलगर्ल म्हणजेच या व्यक्तीची पत्नी पोहचली तेव्हा त्याची तळपायाची आग मस्तकात गेली आणि दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले. दोघांनाही एकमेकांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. आपली पत्नी कॉलगर्ल म्हणून काम करते असं पतीने तक्रारीत म्हटलं आहे. तर दुसरीकडे पत्नीने आपल्या पतीचे मैत्रिणीबरोबर संबंध असल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली आहे. आता या प्रकरणात पोलीस चौकशी करत आहेत. मात्र हे प्रकरण देशभर चर्चेचा आणि बातमीचा विषय झाले आहे.