बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार , बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारा नराधम बाप गजाआड

नागपूरमध्ये बापानेच आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाप लेकीचं एक अतूट नात समजलं जातं. या नात्याकडे कोणीही वाईट नजरेने बघत नाही. मात्र याच नात्याला काळीमा फासणारी घटना शनिवारी नागपूरमधील वाडीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाडी शहरातील एका १५ वर्षीय मुलीवर तिच्याच पित्याने बलात्कार केला आहे. हा प्रकार समोर आल्याने वाडी परीसरात या नराधम पित्याविषयी संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मध्य प्रदेशवरून एक कूंटूब वाडीत मोलमजूरी करून पोट भरण्यासाठी आले होते. शनिवार दि.१८ जानेवारी रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजताच्या दरम्यान घरी सर्व झोपले होते. मुलीची आई बाहेरगावी कामानिमित्त गेली होती. घरी १ भाऊ आणि २ बहीण सर्व बाजूच्या खोलीत झोपले होते.
दरम्यान पीडित मुलगी मध्यरात्री लघुशंकेसाठी उठली असताना हा नराधाम बाप तिच्या मागे गेला आणि ती उठताच त्याने तिच्यावर हात टाकला. याबाबत कोणाला सांगितले तर भाऊ आणि बहिणीला जिवे मारण्याची धमकीही क्रूर बापाने दिली. त्या भितीने पीडित मुलीने कोणाला काही सांगितले नाही मात्र आई गावावरुन परतल्यानंतर पीडितेने आईला या कृत्याबाबत सांगितले. मुलीवर ओढवलेल्या या प्रसंगाने अस्वस्थ झालेल्या आईन तात्काळ पोलीस स्थानकाकडे धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास चालू आहे.