Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राष्ट्रीय वीरता पुरस्कारासाठी मुंबईची झेन सदावर्ते आणि औरंगाबादच्या आकाश खिल्लारेंची निवड

Spread the love

मुंबईची झेन सदावर्ते आणि औरंगाबादचा आकाश खिल्लारे या दोघांची निवड राष्ट्रीय वीरता पुरस्कारासाठी झाली  असून महाराष्ट्राच्या दोन बालकांना सन्मानित करण्यात येणार आहे.  या पुरस्कारासाठी देशभरातून १० मुली आणि १२ मुले  अशा एकूण २२ जणांना पुरस्कार हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या दोघांचा समावेश आहे.

झेन हि प्रसिद्ध विधिज्ञ गुणरत्न आणि जयश्री  सदावर्ते यांची मुलगी आहे . सहावीत शिकणाऱ्या झेन सदावर्तेने  हिने मुंबईतील क्रिस्टल टॉवर या इमारतीला आग लागली त्यावेळीजागरुकपणे १३ जणांचे प्राण वाचवले होते . शाळेत शिकलेल्या धड्यातील माहितीचा वापर तिने या प्रसंगातून सुटका होण्यासाठी केला. आग लागल्याने धुराचे लोट पसरतात. ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढते. अशावेळी एखाद्याचा मृत्यू गुदमरुन होण्याची शक्यता असते. मात्र अशा व्यक्तीच्या तोंडावर ओले कापड ठेवल्यास श्वास घेण्यास त्रास होत नाही. याच धड्यातील माहितीचा वापर करुन झेन सदावर्तेने १३ जणांचे प्राण वाचवले होते.

वीरता पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेला अक्ष खिल्लारे औरंगाबाद येथील रहिवासी असून आकाशने  एका पाच वर्षीय मुलीचा आणि तिच्या आईचा जीव वाचवला. आकाश शाळेत जात असताना त्याला बुडणाऱ्या माय लेकी दिसल्या. त्याने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता या दोघींना वाचवलं. नदीवर कपडे धुण्यासाठी आई आणि मुलगी गेल्या होत्या. त्यावेळी तिची मुलगी पाण्यात पडली. मुलीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी घेतली. मात्र दोघीही बुडू लागल्या. त्याचवेळी तिथून आकाश चालला होता. आकाशने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी मारली आणि या दोघींचा जीव वाचवला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!