भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अखेर जे.पी . नड्डा यांची निवड

भाजपने घोषित केल्याप्रमाणे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंग यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. नड्डा हे २०२२ पर्यंत भाजपचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाचे निवडणूक प्रभारी राधामोहन सिंह यांना नड्डांचे नाव सुचवले होते. यामुळे नड्डा यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड होईल, असं सांगण्यात येत होतं. अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नड्डा हे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष झाले होते. लोप्रोफाइल असलेले आणि वादग्रस्त ववक्त्यांपासून दूरच राहणारे अतिशय प्रभावी नेते, अशी नड्डांची ओळख आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री विजय रूपाणी, मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत, धर्मेंद्र प्रधान, अनुराग ठाकुर, यूपी भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सह अन्य मोठे नेते यावेळी उपस्थित होते. जेपी नड्डा यांची राजकीय सुरुवात ही महाविद्यालयीन राजकारणापासून सुरू झाली. अनेक वर्षांपासून त्यांना संघटनेचा अनुभव आहे. स्वच्छ प्रतिमा असलेले नड्डा यांची संघाशीही त्यांची चांगली जवळीक आहे. भाजपचे वरिष्ठ नेता राधामोहन सिंह हे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीसाठीच्या प्रक्रियेत प्रभारी आहे. राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी २० जानेवारीपर्यंत अर्ज दाखल केले जाणार आहे आणि त्यानंतर निवड प्रक्रिया सुरू होईल.
जे.पी. नड्डा यांचा अल्प परिचय
– नड्डा मूळचे हिमाचल प्रदेशचे असून त्यांचा जन्म – २ डिसेंबर १९६० चा आहे. १० वर्षं अभाविपमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. १९९३ ते २०१२ या काळात ३ वेळा ते आमदार होते. १९९८ साली ते पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रिपद झाले होते. २०१० मध्ये त्यांनी दिल्लीत पक्षाचे काम करण्यास सुरुवात केली होती. युपीए सरकार विरोधात रणनीती आखण्यात त्यांची भूमिका महत्वाची होती. नरेंद्र मोदी, अमित शाहांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. एप्रिल २०१२ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. जून २०१४ साली मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून त्यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी टाकण्यात अली होती. जून २०१९ मध्ये त्यांची कार्याध्यक्षपदाची निवड करण्यात आली होती. शांत आणि मनमिळावू स्वभावाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष निवड ही सर्व सहमतीने आणि कोणत्या लढतीविना बिनविरोध होण्याची परंपरा आहे त्यानुसार हि निवड करण्यात आली. नवीन अध्यक्षाच्या निवडीमुले पक्षातील मागील अध्यक्ष अमित शहा यांच्या साडेपाच वर्षांपेक्षाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. शहा यांचा कार्यकाळ हा निवडणुकांसाठी सर्वात चांगला कार्यकाळ होता. परंतु, काही राज्यांमध्ये भाजपला पराभवाचा सामनाही करावा लागला. जुलै महिन्यात कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांची निवड झाली होती. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये अमित शहा यांची गृहमंत्रिपदी निवड झाली. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार यासाठी नावांचा शोध सुरू होता. कारण आतापर्यंत पक्षात ‘एक व्यक्ती एक पद’ ही परंपरा पहिल्यापासून कायम आहे.