निर्भयाच्या निर्दयी बलात्काऱ्यांना माफ करण्याची याचना करणाऱ्या इंदिरा जयसिंग निर्भयाच्या आईने दिले हे उत्तर …

While I fully identify with the pain of Asha Devi I urge her to follow the example of Sonia Gandhi who forgave Nalini and said she didn’t not want the death penalty for her . We are with you but against death penalty. https://t.co/VkWNIbiaJp
— Indira Jaising (@IJaising) January 17, 2020
बहुचर्चित निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीला विलंब होत असताना आता वकील इंदिरा जयसिंग यांच्या नव्या मागणीने खळबळ उडाली आहे. त्यांनी निर्भयाच्या आईकडे दोषींना माफ करण्याची मागणी केली आहे. दरम्यान इंदिरा जयसिंग मला असा सल्ला देणाऱ्या कोण आहेत. ? पूर्ण देश आरोपींना फाशी व्हावी अशी मागणी करत आहे. अशा लोकांमुळे पीडितांना न्याय मिळत नाही, अशी संतप्त भावना निर्भयाच्या आईने व्यक्त केली आहे.
दोषींनी डेथ वॉरटं जारी केलं आहे. त्यांना २२ जानेवारीला फाशी देण्यात येणार होती पण ती १ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दोषींची फाशी पुढे ढकलल्यानंतर निर्भयाच्या आईने नाराजी व्यक्त केली होती. आता यामध्ये राजकारण नको असंही त्यांनी म्हटलं होतं. निर्भयाच्या आईने प्रतिक्रिया दिल्यानंतर काही वेळातच इंदिरा जयसिंग यांनी ट्विटरवर ही मागणी केली. निर्भयाच्या आईकडून दोषींना माफी मिळावी यासाठी इंदिरा जयसिंग यांनी सोनिया गांधींचे उदाहरण दिलं आहे.
याबाबत इंदिरा जयसिंग यांनी ट्विटरवर म्हटलं की, मला निर्भयाच्या आईच्या वेदना माहिती आहेत. मी त्यांना विनंती करते की, सोनिया गांधींप्रमाणेच त्यांनीही करावं, सोनिया गांधींनी राजीव गांधींच्या हत्या करणाऱ्या नलिनीला माफ केलं आणि तिला मृत्यूदंड देऊ नये असंही सांगतंल होतं. आम्ही तुमच्या सोबत आहे पण मृत्यूदंडाच्या विरोधात आहोत.
दरम्यान मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिला मरणाच्या दारात पोहोचविणाऱ्या नराधमांना माफी द्यावी अशी विनंती करणाऱ्या इंदिरा जयसिंग यांना निर्भयाच्या आईने सडेतोड उत्तर दिलं. इंदिरा जयसिंग मला असा सल्ला देणाऱ्या कोण आहेत. ? पूर्ण देश आरोपींना फाशी व्हावी अशी मागणी करत आहे. अशा लोकांमुळे पीडितांना न्याय मिळत नाही. देशाचे माजी पंतप्रधान यांच्या हत्ये प्रकरणी नलिनीला १९९१ मध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानतंर तिच्यावर गुन्हा सिद्ध झाल्यानंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, सोनिया गांधी यांनी तिला माफ करत मृत्यूदंडाची शिक्षा देऊ नये असं म्हटलं होतं.