अजमेर बॉम्बस्फोटातील फरार झालेला गुन्हेगार मोहम्मद जलीस अन्सारी उर्फ डॉ. बॉम्ब याला कानपुरात अटक

पॅरोलवर असताना गुरुवारी मुंबईहून पसार झालेला अजमेर बॉम्बस्फोटातील गुन्हेगार मोहम्मद जलीस अन्सारी उर्फ डॉ. बॉम्ब याला उत्तर प्रदेशातील कानपूर येथून अटक करण्यात आली आहे. तो देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक ओ.पी. सिंह यांनी हि माहिती दिली. कानपूर येथे अटक केल्यानंतर त्याला लखनऊ येथे आणण्यात येणार असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे.
UP DGP OP Singh: Jalees Ansari (serial blasts convict who was out on parole when a missing complaint was filed by his family y'day in Mumbai) has been arrested when he was coming out from a mosque in Kanpur. He has been brought to Lucknow. It's big achievement of UP Police. pic.twitter.com/olY5PeTycC
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 17, 2020
मुंबईच्या आग्रीपाडा येथे राहणाऱ्या मोहम्मद जलीस अन्सारी उर्फ डॉ. बॉम्ब याला अजमेर येथे १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात सीबीआयने अटक केली होती. चौकशीमध्ये त्याचा देशभरात झालेल्या इतर अनेक बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग असल्याचे समोर आले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जालीस याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जालीस याला अजमेर येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. तुरुंगातूनच त्याने पॅरोलच्या सुट्टीसाठी अर्ज केला. या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने त्याला २१ दिवसांची सुट्टी मंजूर केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जालीस याला अजमेर येथून मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आणि तेथून २८ डिसेंबरला बाहेर सोडण्यात आले. त्यानंतर जालीस हा दररोज सकाळी १० ते १२ वाजताच्या सुमारास आग्रीपाडा पोलिस ठाण्यात येऊन हजेरी देत होता. मात्र, गुरुवारी तो हजेरीसाठी आलाच नाही. कशी केली असता त्याच्या मुलाने जालीस सकाळपासून बेपत्ता असल्याचे सांगितले. त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करीत पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता.
दरम्यान पोलीस त्याच्या मागावर असताना त्याला कानपूरमधून अटक करण्यात करण्यात पोलिसांना यश मिळाले . पॅरोलवर असतानाच जलीस अन्सारी मुंबईतून फरार झाला होता. त्याला आता पोलिसांनी कानपूरमधून अटक केली आहे. 50 पेक्षा जास्त बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग होता. त्यामुळे त्याला डॉ. बॉम्ब असेही संबोधत. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातही त्याचा सहभाग होता. अन्सारी हा मागील काही महिन्यांपासून अजमेरच्या तुरुंगात होता. त्यानंतर तो जेलमधून पॅरोलवर बाहेर आला होता. अन्सारी आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मोमीनपुरा येथे राहणारा आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राजस्थानातील अजमेर या ठिकाणी असलेल्या तुरुंगातून अन्सारी २१ दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला आणि फरार झाला. मात्र त्याला कानपूरमधून अटक करण्यात आली आहे.