निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशी लांबणीवर

2012 Delhi gangrape: Delhi Court directs Tihar jail authorities to file proper report by Jan 17 about status of scheduled execution of convicts. Directions passed after jail authorities informed, they wrote to Delhi govt on issue of scheduled execution in view of pending remedies
— ANI (@ANI) January 16, 2020
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याच्या याचिकेवरील सुनावणीत पतियाळा हाऊस कोर्टाने म्हटले आहे की , २२ जानेवारीला फाशी देता येणार नाही. मुकेश सिंहचा दयेचा अर्ज प्रलंबित असल्याने फाशी देता येणार नसल्याचे कोर्टाने सांगितले. दया अर्ज प्रलंबित असल्याने डेथ वॉरंटवर स्वत:च स्थगिती येते. फाशी देण्याची नवी तारीख काय असेल, हे तुरुंग प्रशासनाच्या उत्तरानंतर ठरेल. तुरुंग प्रशासनाने शुक्रवारी १७ जानेवारी पर्यंत कोर्टाला स्टेटस रिपोर्ट द्यायचा आहे.
दिल्ली सरकारने आज गुरुवारी निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याचा दयेचा अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणातील चारही दोषींना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली असून त्यांना २२ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता फाशी दिली जावी असा निर्णय देत पतियाळा हाऊस कोर्टाने ७ जानेवारीला डेथ वॉरंट जारी केले होते. त्यानंतर यापैकी एक दोषी मुकेश सिंह याने तिहार तुरुंगातून राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. दिल्ली कोर्टाने तिहार तुरुंग प्रशासनाला आदेश दिले आहेत की तुरुंग प्रशासनाने १७ जानेवारीपर्यंत फाशीच्या प्रक्रियेच्या अंमलबजावणीच्या स्थितीबाबत माहिती द्यावी. तुरुंग प्रशासनाने माहिती दिल्यानंतर पुढील निर्देश दिले जातील, असं कोर्टाने म्हटलं आहे.