महिला रुग्णाला डॉक्टर म्हणाले ” तू मला खूप आवडतेस ” तीने दाखल केली विनयभंगाची तक्रार आणि डॉक्टरने केली आत्महत्या…

रुग्णालयात आलेल्या महिला रुग्णाला ” तू मला खूप आवडतेस ” असे म्हटल्याने महिला व्यथित झाली आणि तिने थेट पोलिसात संबंधित डॉक्टरविरुद्ध विनयभंगाची दिली परंतु आपल्यावर असा आरोप झाल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना नाशिकमधील सिन्नर इथं घडली आहे. महिला रुग्णाच्या तक्रारीनंतर नाशिकमधील एका डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर डॉक्टरने सातव्या मजल्याच्या टेरेसवरून उडी घेत आत्महत्या केली.
दरम्यान, विनभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आलेल्या डॉ. गोरे यांच्या आत्महत्येनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात पोलीस आता अधिक तपास करत आहेत. याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि , पीडित महिला रुग्ण पित्ताचा त्रास होत असल्यानं डॉक्टर गोविंद गारे यांच्या स्नेहल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली होती. उपचार घेत असतांना डॉक्टर गारे यांनी ‘मला तू खुप आवडते’ असं म्हटलं. त्यानंतर पीडित महिलेने सिन्नर पोलिसांत तक्रार दिली होती.
महिला रुग्णाच्या तक्रारीनंतर सिन्नर पोलिसांनी डॉक्टर गारे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. अवघ्या चार ते पाच तासात डॉक्टर गारे यांनी आत्महत्या केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ. गोरे प्रचंड तणावात होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.