Aurangabad Crime : गुंतवणूकदारांना दाम- दुपटी चे आमिष दाखवणाऱ्या ‘बंटी- बबली’ ला अटक

तीन वर्षांपासून २०० कोटींचे बॅंकेचे व्यवहार
औरंगाबाद -२०आठवड्यात दाम दुपटीचे अमीष दाखवत १कोटी४६ लाखांना चुना लावणार्या ठगांच्या टोळीतील दांपत्याला जिन्सी पोलिसांनी हुबळीहून अटक करुन अाणले.त्याच्या ताब्यातून ३० लाखाची कार जप्त केली. आरोपींना ४ दिवसांची पोलिस कस्टडी मिळाली आहे.
रिजवान मोहम्मद चमन(३७) व त्याची पत्नी नाजिया कौसर (३७) रा.जि.चित्रदुर्ग , कर्नाटक अशी अटक आरोपींची नावे आहेत. या दांंपत्यासोबत आरोपीचा सासरा, मेव्हणा,व अन्य नातेवाईक असल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
बायजीपुर्यातील पठाण अन्वरखान (३७) यांच्या मित्रामार्फत आरोपी रिजवानच्या संपर्कात एक वर्षांपूर्वी आले. रिजवानची एव्हरग्रीन बिझनेस सोल्यूशन हि आंतरराष्र्टीय दर्जाची कंपनी असल्याचे रिजवानने अन्वरखान यांना सांगितले व अन्वर यांच्या कडून एक वर्षांपूर्वी रिजवानने वीस आठवड्यात दामदुपटीचे अमीष दाखवत १ कोटी ४६ लाख रु. घेऊनपरतावा देण्यास टाळाटाळ करु लागला.
अन्वरखान यांनी तक्रार देताच पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी गुन्हा दाखल करुन पीएसआय सरवर शेख यांनी कर्नाटकातून चोरटे दांपत्य अटक करुन आणले.गेल्या २०१७ पासून रिजवान ने चित्रदुर्ग परिसरातील लोकांसोबंत २००कोटींचे व्यवहार बॅंकेमार्फत केल्याचे उघंड झाले.चित्रदुर्ग शहरात तेथील नागरिकांनी रिजवान आणित्याच्या पत्नीला जगणे मुश्कील केले होते.म्हणून शहरातून पळून जाऊन रिजवानने हुबळीमधे फ्लॅट व महागडी कार खरेदी केली.
वरिल कारवाईत पोलिस निरीक्षक व्यकटेश केंद्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली पीऐसआय सरवर शेख, दत्ताा शेळके, कर्मचारी हेमंत सुपेकस, भाऊ साहेब जगताप यांनी सहभाग घेतला होता.