उत्तर प्रदेश : स्लीपर बस आणि ट्रकला अपघात , २० प्रवासी ठार , अनेक जखमी

Kannauj: A bus carrying 50 passengers catches fire after collision with a truck on GT Road. Fire tenders have rushed to the spot. More details awaited pic.twitter.com/aRdZC8ElhG
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 10, 2020
उत्तर प्रदेशमच्या कन्नौजमध्ये शुक्रवारी रात्री ट्रक आणि खासगी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात २० जण ठार झाले तर अनेक जण जखमी आहेत. . या अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग लागल्याने अनेक प्रवासी आगीत होरपळले. दरम्यान, मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ५० प्रवासी होते, अशी माहिती आहे. काही प्रवाशांना बसमधून सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले तर बहुतांश प्रवासी बसमध्ये अडकल्याचे समजते.
कन्नौजच्या जीटी रोड महामार्गावर ग्राम घिलोई भागात ट्रक आणि डबल डेकर स्लीपर बसमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग लागली, अशी माहिती कानपूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली.
अपघातग्रस्त खासगी बस कन्नौजमधील गुरसहायगंज येथून जयपूरला जात होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची दखल घेतली असून, कन्नौजच्या जिल्हाधिकारी आणि पोलिसांना घटनास्थळी तातडीने जाऊन प्रवाशांना सुरक्षा आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा अपघात रात्री ८ वाजताच्या सुमारास घडल्याचे समजते. हा अपघात झाला, तेव्हा बसमधील प्रवासी झोपले होते. त्यामुळे प्रवाशांना लगेचच बाहेर पडता आले नाही, अशी माहिती आहे.