Breaking News : बहुचर्चित नागरिकत्व सुधारणा कायदा आजपासून संपूर्ण देशभरात लागू , अधिसूचना जारी , मुस्लिमांना हा कायदा लागू नाही

The Central Govt hereby appoints the 10th day of January, 2020 as the date on which the provisions of the Citizenship (Amendment) Act, 2019 shall come into force pic.twitter.com/S9OFwESrru
— DD News (@DDNewslive) January 10, 2020
बहुचर्चित आणि वादग्रस्त झालेला नागरिकत्व सुधारणा कायदा आजपासून संपूर्ण देशात लागू करण्यात आला आहे. यासंदर्भातली अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. म्हणजेच १० जानेवारी २०२० ही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची संपूर्ण भारतात अंमलबजावणी करण्याची तारीख ठरली आहे. दरम्यान, या कायद्याला देशात विविध ठिकाणी विरोध सुरूच असून अनेक राज्यांनी देखील या कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशाच्या दोन्हीही सभागृहात नागरिकत्व सुधारणा विधेयक संमत झाल्यानंतर या विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले. दरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहात केंद्र सरकारनं मंजूर करून घेतलेल्या या नागरिकत्व सुधारणा कायद्याला मात्र देशभरातून विरोध होत आहे. देशाच्या अनेक राज्यांत या विषयावरून निदर्शने , मोर्चे आणि आंदोलने चालूच आहेत. अनेक राज्यात अनेक ठिकाणी तर या आंदोलनांना हिंसक वळण लागले.
या कायद्यानुसार ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसाठी हा कायदा लागू आहे. धर्माच्या आधारे त्यांचा या देशांमध्ये छळ झालेला आहे, त्यांच्यासाठी हा कायदा लागू आहे. विदेशी नागरिकांना हा कायदा लागू नाही. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशसह इतर देशातून भारतात स्थायिक झालेले विदेशी नागरिक आणि मुस्लिमांना हा कायदा लागू नाही.
Ministry of Home Affairs: Central Government appoints the 10th day of January, 2020, as the date on which the provisions of the Citizenship Amendment Act shall come into force. pic.twitter.com/QMKYdmHHEk
— ANI (@ANI) January 10, 2020