औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीकडे आज सर्वांचेच लक्ष

राज्यातील सत्तांतरानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेची निवडणूक अत्यंत चारशीची झाली. एका बाजूला शिवसेना , काँग्रेस , राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी असताना भाजपने शिवसेनेच्या मावळत्या जि.प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांना फोडून त्यांनाच अपक्ष उमेदवारबनवून पाठिंबा दिला आणि औरंगाबाद जिल्हा परिषदेतील राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले. नाशिक, कोल्हापूर, जळगाव, सांगली येथील निकाल लागल्यानंतर सर्व राजकीय नेत्यांच्या नजर औरंगाबादकडे जि.प.कडे लागल्या होत्या. काल झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोणगावकर आणि काँग्रेसच्या मीनाताई शेळके यांच्यात चुरशीची लढत होऊन दोघींनाही समान मत पडल्याने आजची निवडणूक उद्यापर्यंत स्थगित करण्यात आली. त्यामुळे आता आज होणाऱ्या निकालात अध्यक्ष कोणाचा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज दि . ४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता चिठ्ठी टाकून किंवा टॉस करुन अध्यक्षांची निवड होईल असे सांगण्यात येत आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेत सर्वाधिक २३ सदस्य भाजपकडे असून शिवसेना १८, काँग्रेस १६, राष्ट्रवादी ३, मनसे १, डेमोक्राटीक १ असे पक्षीय बलाबल आहे. गेल्यावेळी शिवसेनेने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसची मदत घेत आपला अध्यक्ष केला होता. त्यानंतर आता अध्यक्षपदावर दावा सांगत शिवसेनेला दिलेल्या शब्दाची आठवण करुन दिल्याने महाविकास आघाडीच्यावतीने काँग्रेसच्या मीनाताई शेळके यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र मावळत्या अध्यक्ष यांनी भाजपच्या मदतीने बंडखोरी करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत २९ मते मिळविली याचा अर्थ महाविकास आघाडीची सहा मते फोडण्यात भाजपला यश मिळाले.
काहीही झाले तरी आपल्याच पाठिंब्यावर अध्यक्ष व्हावा यासाठी भाजप नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे हि लढत अत्यंत वर्षीची झाली. यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे नेते स्वतः या सर्व राजकारणावर लक्ष ठेवून होते परंतु भाजपने शिवसेनेच्या मावळत्या अध्यक्षांनाच आपल्या गळाला लावण्यात यश मिळविले त्यामुळे डोणगावकर यांना शिवसेनेच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना बाळाचा वापर करावा लागला. आजच्या या निकालाकडे सर्व राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.