भीमा कोरेगाव प्रकरणी पुणे पोलिसांचा नवा खुलासा

बहुचर्चित भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील पोलीस तपासाविषयी नवा खुलासा केला आहे. या तपासात नवी माहिती बाहेर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून या तपासात पुणे पोलीस आता थेट अमेरिकेची तपास संस्था असलेल्या एफबीआय , फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशनची मदत घेणार असल्याचे वृत्त आहे.
पोलिसांनी या प्रकरणी अधिक माहिती देताना सांगितले कि , सध्या अटकेत असलेले वरावर राव यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या हार्ड डिस्कमधला डाटा मिळविण्यासाठी ही मदत घेण्यात येणार आहे. वरावर राव यांच्यावर माओवाद्यी चळवळीला मदत करण्याचा ठपका आहे. पोलिसांनी राव यांच्या घरी छापा घालून काही हार्ड डिस्क जप्त केल्या होत्या. मात्र त्यातून मोठा प्रमाणावर डेटा डिलीट करण्यात आलाय. तो डेटा मिळविण्यासाठी पोलीस ही मदत घेण्यात येणार आहे. यासाठी पुणे पोलिसांचं एक पथक अमेरिकेला जाणार आहे.
दरम्यान, हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडेंसह १६३ जणांना पुणे जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच चार तालुक्यांमध्ये कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आला आहे. दरम्यान, १ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी संभाजी भिडे गुरूजी व मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.