Jharkhand assembly results : भाजपला मोठा दणका, काॅंग्रेस आणि मित्र पक्षांची आघाडी

#JharkhandAssemblyElections : BJP leading on 27 seats, Congress-JMM-RJD alliance leading on 43 seats. https://t.co/cPeuZAUxCH
— ANI (@ANI) December 23, 2019
महाराष्ट्राला पाठोपाठ झारखंड मध्येही भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेससह मित्रपक्षांना बहुमत मिळत असल्याचे चित्र आहे.
सकाळी ८ वाजता झारखंड विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार असले तरी सुरूवातीच्या कलामध्ये भाजपा पिछाडीवर आहे. राज्यातील ८१ जागांसाठीच्या प्रचारात सत्ताधारी भाजप विरुद्ध झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीत सरळ सामना झाला. एकूण पाच टप्प्यात मतदान झाले. मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपला धक्का बसेल असा अंदाज वर्तवलेला आहे.
मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर काँग्रेस-जेएमएम आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई काळ दिसत होती. मात्र, काही मतमोजणीच्या फेऱ्या झाल्यानंतर ३२ जागांवर आघाडी घेतलेल्या भाजपाची घसरगुंडी उडाली आहे. भाजपा २७ जागांवर तर काँग्रेस-जेएमएमची वाटचाल पन्नाशीकडं सुरू झाली असून, सध्या ४३ जागांवर आघाडी घेतली आहे.