भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद अटकेत , आणखी १५ आंदोलकांना अटक

कालच्या दिल्लीतील आंदोकानातून पोलिसांना चकवा देऊन पसार झालेले भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेकर आझाद यांना आज सकाळी जामा मशिदी जवळ आंदोलन करताना अटक करण्यात आली. दरम्यान दरियागंज परिसरामध्ये शुक्रवारी उफाळलेल्या हिंसाचार प्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी शनिवारी सकाळी माहिती दिली. सुरुवातीला दहा जणांना पकडलं होतं. त्यानंतर पाच जणांना अटक करण्यात आली.
नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशभरात तीव्र विरोध होत आहे. काल शुक्रवारी दरियागंजमध्येही झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या प्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला दहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पाच जणांना अटक केली, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी सकाळी दिली. आंदोलन आणि हिंसाचारप्रकरणी एकूण ४० जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यातील आठ अल्पवयीनांना शनिवारी सकाळी सोडून देण्यात आलं. ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांपैकी १५ जणांना अटक करण्यात आली आहे. अजून काही जणांना अटक होईल, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
दरम्यान दिल्लीच्या सीमापुरी परिसरातही शुक्रवारी झालेल्या आंदोलनादरम्यान, दगडफेक केल्याच्या आरोपाखाली पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. या आंदोलनात शाहदरा जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त यात किरकोळ जखमी झाले होते. शुक्रवारी नमाज पठणानंतर जामा मशिदीच्या बाहेर मोठ्या संख्येने लोक जमले होते. तेथे शांततापूर्ण आंदोलन सुरू होते. दुपारी दोनच्या सुमारास भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझादही त्याठिकाणी पोहोचले . त्यांच्या हातात राज्यघटनेच्या प्रती होत्या. या परिसरातही हिंसक आंदोलन होण्याची शक्यता होती. त्यामुळं पोलिसांनी बॅरिकेड्स लावले. चार वाजण्याच्या सुमारास आंदोलक दिल्ली गेटच्या दिशेने जाऊ लागले. सहा वाजताच्या सुमारास आंदोलकांनी दगडफेक केली आणि एका कारला पेटवून देण्यात आले . या हिंसाचारात दिल्लीबाहेरच्या लोकांचा सहभाग होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पीटीआयच्या वृत्तानुसार, भीम आर्मीचे प्रमुख आझाद यांना शनिवारी सकाळी जामा मशिदीच्या बाहेर अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. जामा मशिद ते जंतर-मंतर असा मोर्चा काढण्याची घोषणा त्यानं केली होती. मात्र, तो पोलिसांच्या ते हातून निसटले होता. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी बराच वेळ त्याचा शोध घेतला पण ते सापडले नवहते आज अखेर सकाळी त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.