Pune Crime : महिलांना अश्लील मेसेज पाठविणाऱ्या पुजाऱ्याला अटक

पुण्यात महिलांना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या ८४ वर्षीय पुजाऱ्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. बाबा हरिदास महाराज उर्फ शरद बाळकृष्ण पत्की असे आरोपी पुजाऱ्याचे नाव आहे. आरोपी पुजाऱ्याला गुरूवारी शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या काही महिन्यांपासून आरोपी पुजारी महिलांना अश्लील मेसेज पाठवून त्यांना त्रास देत होता. स्वारगेट पोलिसांनी कारवाई करत माण तालुक्यातील शेणवाडी गावातील एका मंदिरात पुजाऱ्याच्या हाता बेड्या ठोकल्या. पुजारी उच्चशिक्षित असून इलेट्रिक इंजिनिअर आहे. मात्र, तो वारंवार अश्लील मेसेज करत असल्याचा आरोप काही महिलांनी केला होता. महिलांच्या तक्रारीनंतर स्वारगेट पोलिसांनी साताऱ्यात माण तालुक्यातील शेणवाडी गावातील एका मंदिरातून त्याला अटक केली.