Nagpur : हिवाळी अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकर आणि गायीच्या मुद्द्यांवरून भाजपाला सुनावले असे खडे बोल….

नागपुरात चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा समाचार घटना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केली . ‘सावरकर’ आणि हिंदुत्वाच्या मुद्यांवरील फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना ‘भारतीय जनता पक्षाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे गायीबाबतचे मत मान्य आहे का?’, असा थेट सवाल करत एकूणच भाजप आणि फडणवीस यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वप्नातील अखंड हिंदुस्तान हवा आम्हालाही आहे, तुम्हाला हवा की नको ते ठरवा असे सांगत गोवंश हत्याबंदीचा कायदा देशातील सर्व राज्यांमध्ये का लागू करण्यात आला नाही, असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे गाय आणि हिंदुत्वाबातचे मत बेगडी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मत मांडले. या वेळी त्यांनी गोवा राज्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे गोमांवस खाण्याबाबतचे मत मांडत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.’ माझ्या राज्यात गाय माता, बाजूच्या राज्यात जाऊन खाता’, असा टीका करीत गोव्यामध्ये मी गोमांस कमी पडू देणार नाही असे दिवंगत मनोहर पर्रिकर बोलल्याचे सभागृहात सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवंगत मनोहर पर्रिकर यांची गोमांसाबाबतची भूमिका सभागृहाच माडतानाच केंद्रातील मंत्री किरेन रिजीजू यांचेमतही सभागृहात सांगितले. किरेन रिजीजू यांनी मी गोमांस खाणार असे ठामपण सांगितले होते, असे सांगत, कोणाला सावरकर शिकवता, तुम्हाला ते कळलेत का? असे प्रश्न विचारत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला.
बेळगाव, कारवार भागातील मराठी बांधवांवर आजही अन्याय होत आहे. बेळगाव, कारवारमध्ये राहणारी मराठी नागरिक हे हिंदू नाहीत का? बाहेरील देशातील हिंदूना न्याय देण्यासाठी केंद्र सरकार निघाले आहे. बाहेरच्या हिंदूना नक्की न्याय द्या, मात्र देशातील हिंदूंना न्याय देणार की नाही, असा सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला आहे. कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणण्याची आवश्यकता असून कोर्टात या प्रलंबित प्रकरणी केंद्र सरकाने कर्नाटकची बाजू घेतल्याचेही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले. कर्नाटकाच भाजपचे राज्य आहे, केंद्रातही आहे, मग बेळगाव, कारवारचा प्रश्न का सोडवला जात नाही, असा सवालही त्यांनी केला. जर देशातील हिंदूंना न्याय देत नसाल तर बाहेरच्या हिंदूंना घ्या असे म्हणण्याला काय अर्थ आहे असेही ते म्हणाले. बाहेरील हिंदूंना नक्की आश्रय द्या, मात्र कुठे घेणार तेही सांगा, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.