निर्भया प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्या न्यायिक मर्यादा तेंव्हा निर्भयाची आई धुसमुसून रडली , कोर्टाने केले सांत्वन ….

निर्भया प्रकरणात न्याय मिळण्यात होत असलेल्या विलंबावरून रडू कोसळलेल्या निर्भयाच्या मातापित्यांना उद्देशून कोर्ट म्हणाले कि , “कोर्टाला तुमच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे. आम्हाला कळतंय की कुणाचा तरी जीव गेला आहे. पण त्यांचे (दोषींचे) अधिकारही आहेत. आम्ही तुमचं ऐकायला इथे आहोत. पण आम्हीही कायद्याने बांधले गेलो आहोत.”
Court to Mother of 2012 gangrape victim: Have full sympathy with you. We know someone has died but there are their(convicts) rights too. We are here to listen to you but are also bound by the law. https://t.co/KVl68DZEm8
— ANI (@ANI) December 18, 2019
देशभर निर्भत्सना करण्यात आलेल्या दिल्लीत २०१२ साली झालेल्या सामूहिक बलात्कार आणि निर्घृण हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टाने दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवत पुनर्विचार याचिका फेटाळली असली, तरी या बलात्काऱ्यांना दयेचा अर्ज नव्याने करण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान अजूनही या नराधमांना फाशी दिली जात नाही हे सांगण्यासाठी कोर्टात उभ्या राहिलेल्या निर्भयाच्या आईला – आशादेवी यांना अश्रू अनावर झाले. त्या बोलता बोलता सर्वोच्च न्यायालयात अगतिक होऊन ढसाढसा रडू लागल्या तेंव्हा निर्भयाच्या वडिलांनाही या वेळी अश्रू अनावर झाले. त्यावर न्यायालयाने वरील उद्गार काढले.
निर्भया प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा कायम असली, तरी शिक्षेची अंमलबजावणी पुढे ढकलली आहे. आता कोर्टाने दयेचा अर्ज करण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिल्याने ७ जानेवारीला पुढच्या सुनावणीची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील महिन्यापर्यंत तरी निर्भयाच्या नराधमांना फाशी होऊ शकत नाही हे लक्षात येताच निर्भयाच्या आई-वडिलांचा कोर्टातच संयम संपला आणि त्यांना रडू कोसळले त्यावर कोर्टाने या दोघांचं सांत्वन करीत आपल्या मर्यादा स्पष्ट केल्या.
Delhi Court directs Tihar Jail authorities to issue a fresh notice for one week to convicts(2012 Delhi gangrape case) as to whether they want to file mercy petitions. Next date of hearing is 7th January https://t.co/KBfyBPDRiw pic.twitter.com/iBfRV6hof9
— ANI (@ANI) December 18, 2019