अच्छे दिन : स्वस्त धान्य दुकानांवर आता अन्न धान्याबरोबर स्वस्त दरात मिळणार चिकन , मटण आणि अंडी

स्वस्त धान्य दुकानांवर आता अन्नधान्यांबरोबरच स्वस्त दरात चिकन, मटण आणि अंडी देखील मिळण्याची शक्यता आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, रेशन दुकानातून गरिबांना स्वस्त दरात चिकन, मटण आणि अंडी देखील उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा विचार चालू असल्याचे म्हटले आहे.
या वृत्तात म्हटले आहे कि , रेशन दुकानांवर आता पोषणयुक्त पदार्थ देण्याचा सरकारचा विचार असून प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थांमध्ये मटण, अंडी, मच्छी आणि चिकन या खाद्यवस्तू ग्राहकांना खरेदी करता येतील. पोषण सुरक्षेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नीती आयोगाकडून ही योजना तयार केली जात आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, अन्नसुरक्षा योजनेचा विस्तार करून पोषण सुरक्षेला सरकार प्राधान्य देण्याच्या विचारात आहे. गरिबांना पोषण आहार सहज आणि कमी किंमतीत उपलब्ध व्हावा, हा यामागील उद्देश आहे. सुरुवातीला किमान एक ते दोन प्रोटीनयुक्त पदार्थ रेशन दुकानावर उपलब्ध केले जातील असं सांगितले जात आहे.
नीती आयोगाकडून रेशन दुकानांवरील वस्तूंची यादी आणखी व्यापक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला किमान एक ते दोन प्रोटीनयुक्त पदार्थ रेशन दुकानावर उपलब्ध केले जातील. देशातील कुपोषण आणि अॅनिमियासारख्या समस्या दूर करण्यासाठी पुढील १५ वर्षांसाठी नीती आयोगाकडून एक व्हिजन डाक्युमेंट बनवले जाणार आहे, ज्यात पौष्टीक खाद्यपदार्थ आणि पोषण सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल. हे व्हिजन डाक्युमेंट १ एप्रिल २०२० पासून लागू केले जाईल. यामुळे अन्नसुरक्षा विधेयक आणखी मजबूत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.