जामिया मिलिया विद्यापीठातील पोलीस कारवाईचे अमित शहा यांच्याकडून समर्थन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी हे स्पष्ट केले कि, सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयावर ठाम आहे. जामिया मिलिया विद्यापीठातील पोलीस कारवाईचेही त्यांनी समर्थन केले. जमावाकडून सुरु असलेला हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांना कारवाई करणे भाग पडले असे अमित शाह म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात फक्त अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, जामिया मिलिया विद्यापीठ, लखनऊ आणि जेएनयू या चार विद्यापीठांमध्ये मोठया प्रमाणावर विरोध झाला आहे असे अमित शाह इंडिया इकोनॉमिक कॉनक्लेव्ह परिषदेमध्ये म्हणाले.
शहा म्हणाले कि , “देशभरात ४०० विद्यापीठं आहेत. त्यातील फक्त २२ विद्यापीठांमध्ये आंदोलनं झाल्याचे समोर आलं आहे” असे शाह यांनी सांगितले. “जामियामध्ये तोडफोड आणि हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. कुठल्याही प्रकारे हिंसाचारा समर्थन करता येणार नाही. परिस्थिती बिघडेपर्यंत थांबून कायदा-सुव्यवस्था राखली जाईल का? असा सवाल अमित शाह यांनी केला.
तुम्ही पंतप्रधानपदाचे दावेदार असू शकतात का? नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर भाजपाची धुरा सांभाळण्यासाठी तुम्हाला तयार केलं जात आहे का? असे सवाल अमित शाह यांना करण्यात आले. यावर बोलताना आपल्यापेक्षाही दिग्गज नेते पक्षात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले कि , ‘ जर तुम्ही पंतप्रधान पदासाठी माझ्या नावावर चर्चा करत आहात, तर मी अजुनही पक्षातील ज्युनिअर सदस्य आहे. माझ्यापेक्षाही अनेक वरिष्ठ नेते पक्षात आहेत. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही.