मूल होत नाही म्हणून सुनेला सासरच्यांकडून बेदम मारहाण

सुनेला मूल होत नसल्याने वांझोटी म्हणून हिणवत सासरच्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उल्हासनगर हिललाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काकडवाल गावात ही घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सासरच्यांवर उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्यांनी बेदम मारहाण केल्याने प्राजक्ताच्या शरीरावर सगळीकडे काळेनिळे डाग पडले आहेत. सध्या तिच्यावर डोंबिवलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राजक्ता भाने असे या पीडितेचं नाव आहे. प्राजक्ताचा २०१५ साली काकडवाल गावातील नवनाथ भाने याच्याशी विवाह झाला होता. मात्र, मुल होत नसल्याने तिला सासरचे वांझोटी म्हणून हिणवत होते. त्यांच्या अत्याचाराची सीमा इतकी वाढली की, त्यांनी तिला मूल होत नसल्याच्या कारणांवरून बेदम मारहाण मारून एका खोलीत काही दिवस डांबून ठेवले होते. कशी बशी यातून तिने स्वतःची सुटका करून उल्हासनगरच्य्या हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दिली.