खळबळजनक : प्रेम संबंध मान्य नसल्याने मोठ्या मुलीचे तुकडे करून विल्हेवाट लावणारा नराधम बाप अखेर गजाआड !!

कल्याण स्टेशन परिसरातील टॅक्सी स्टँडजवळ रविवारी पहाटे एका बॅगेत सापडलेल्या शीर नसलेल्या महिलेच्या मृतदेहाचा आणि आरोपीचा शोध लावण्यात अखेर कल्याण-उल्हासनगर पोलिसांना यश आले असून खून झालेल्या महिलेच्या पित्याला गजाआड केले आहे. हा आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून तिचा पिताच असल्याचे पोलिसांनी सांगितले असून अरविंद तिवारी असे अटक करण्यात आरोपीचे नाव आहे. मुलीच्या प्रेम प्रकरणाला तीव्र विरोध असल्याने हे दुष्कृत्य केल्याची कबुली आरोपाने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुलीचे प्रेमसंबंध मान्य नसल्याने तिचा पिता अरविंद तिवारी यानेच संतप्त होऊन मुलीची हत्या केली आणि नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते वेगवेगळ्या बॅगेत ठेवले. त्यातील एक बॅग कल्याण स्टेशनबाहेर ठेवली होती. तर शीर आणि वरचा भाग त्यांने टिटवाळा येथे एका ठिकाणी पुरल्याची कबुली दिली. त्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी सांगितले कि , आरोपी पित्याने दिलेल्या कबुली जबाबानुसार त्याला चार मुली आहेत. त्यातील ही मुलगी मोठी होती. त्याने घरातच या मुलीची हत्या केली. टोकाच्या वादात मुलीच्या शरीराचे २ तुकडे केले. त्यापैकी शीर आणि वरचा भाग त्यांने टिटवाळा येथे पुरला तर मृतदेहाचा खालचा भाग एका सुटकेसमध्ये भरून हि सुटकेस कल्याण स्थानकाबाहेर ठेवली .
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एका बॅगेत महिलेचा कमरेपासून अर्धा मृतदेह सापडल्याचे वृत्त पसरताच या भागात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेमुळे गजबजलेल्या स्टेशन परिसरात असा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र सदर बॅग ठेऊन जाणारा आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला आणि याच सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्यानुसार ठाणे क्राईम ब्रँचच्या कल्याण आणि उल्हासनगर युनिटने आरोपीला शोधून काढण्यात आणि अटक करण्यात यश मिळवले . पोलीस आरोपीची कसून चौकशी करीत आहेत. कसलाही ठोस पुरावा हाती नसताना केवळ २४ तासांच्या आत ठाणे क्राईम ब्रँचच्या कल्याण आणि उल्हासनगर युनिटने ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.