Hyderabad Encounter : नेत्यांनी आणि अभिनेत्यांनी केले पोलिसांचे स्वागत…

#WATCH Samajwadi Party MP Jaya Bachchan on accused in the rape and murder of the woman veterinarian in Telangana killed in an encounter: Der aaye, durust aaye…der aaye, bohot der aaye.. pic.twitter.com/sWj43eNCud
— ANI (@ANI) December 6, 2019
हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींच्या एन्काउंटरनंतर समाजातील विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर प्रत्येकजण ‘न्याय मिळाला’ अशी समान भावना करताना दिसत आहे. फक्त सामान्य माणूसच नाही तर, बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनीही या निकालाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या घटनेनंतर तेलंगण पोलिस आणि त्यांनी तत्परतेने केलेल्या कृतीबद्दल आपल्याला अभिमान वाटत असल्याचे या कलाकारांनी म्हटले आहे.
समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी हैदराबाद सामुहिक बलात्काराच्या एन्काउंटरप्रकरणी ‘देर आए दुरुस्त आए’ अशी प्रतिक्रिया दिली. काही दिवसांपूर्वी संसदेत या प्रकरणी बोलताना जया यांनी आरोपींना जमावाकडे सुपूर्द करण्यात यावं अशी मागणी केली होती. जया यांच्या या वक्तव्याचा अनेकांना धक्का बसला होता. शिवाय त्यांच्या त्या विधानावरून गदारोळही झाला होता. उन्नाव आणि इतर बलात्काराच्या घटनांवर अशीच शिक्षा करण्यात यावी का ? या प्रश्नावर मात्र जया यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते.
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आणि अनुपम खेर यांनीही तेलंगणा पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी तेलंगण पोलिसांचं कौतुक करून ‘उत्तर प्रदेश व दिल्लीच्या पोलिसांनी यापासून धडा घ्यावा,’ असं मत मायावती यांनी व्यक्त केलं आहे. उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचारांत सतत वाढ होत आहे. मात्र, राज्य सरकार झोपलं आहे. खरंतर, तेलंगणच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईपासून उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या पोलिसांनी प्रेरणा घ्यायला हवी. मात्र, यूपीमध्ये जंगलराज आहे. इथं गुन्हेगारांना सरकारी पाहुण्यासारखी वागणूक दिली जाते, हे दुर्दैव आहे,’ अशी खंत मायावती यांनी व्यक्त केली.
माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी देखील एन्काउंटरच्या कारवाईचं स्वागत केलं आहे. ‘ज्या क्रूरतेनं दिशाचा बळी घेतला गेला होता, ते पाहता तिच्या कुटुंबीयांचं दु:ख कधीच कमी होणार नाही. पण देशातील इतर मुलींच्या मनातील भीती नक्कीच कमी होईल,’ असं उमा भारती यांनी म्हटलं आहे.