हैद्राबाद प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी त्याने इमारतीच्या छतावर चढून दिली आत्महत्येची धमकी

Khammam: A graduate student threatened to commit suicide by jumping off a building, demanding capital punishment for the accused persons who raped and killed the woman veterinarian. Police rescued & counselled him, and later handed him over to his parents. #Telangana pic.twitter.com/vs5zvmfrgH
— ANI (@ANI) December 1, 2019
हैदराबाद (तेलंगणा) येथे महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कारानंतर जाळल्याप्रकरणी देशभरात संताप उठला आहे. रविवारी तेलंगणाच्या खम्मम येथील विद्यार्थ्याने इमारतीच्या छतावर चढून आरोपींनी फाशीची शिक्षा द्या नाही तर मी आत्महत्या करेन अशी धमकी दिली आहे. गच्चीवरून उडी मारण्याची धमकी तरुणाने दिल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली होती.
स्वतः पदवीधर असलेल्या या तरुणाचा संताप अनावर झाल्याने त्याने इमारतीच्या गच्चीवर चढून हैदराबाद प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी देण्याची मागणी करीत असे झाले नाही तर तो छतावरून उडी घेऊन आत्महत्या करेल अशी धमकी दिली. या प्रकारामुळे इमारतीच्या खाली लोकांची मोठी गर्दी झाली होती.पोलिसांना हि माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी विद्यार्थ्याला समजावून छतावरून खाली उतरले आणि त्याला शांत केलं. त्याचे समुपदेशन केल्यानंतर त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळेही परिसरात खळबळ उडाली होती.