Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पतीने हातातील मोबाईल हिसकावल्याच्या रागातून पत्नीने घेतला हाताचा कडाडून चावा…

Advertisements
Advertisements
Spread the love

पतीने मोबाइल हिसकावला म्हणून संतापलेल्या पत्नीने पतीच्या हाताला चावा घेतला आहे. कल्याण मध्ये घडलेल्या या प्रकरणी पती दिलीप यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisements

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कल्याण पश्चिमेकडील खंडागळे सदन येथे दिलीप रेहनकर कुटुंबासह राहतात. शनिवारी सकाळी दिलीप यांच्या पत्नी नूतन या मोबाइल घेऊन बाथरूममध्ये गेल्या होत्या. बाथरूममधून बाहेर आल्यानंतर दिलीप यांनी नूतन यांच्याकडे मोबाइल मागितला, मात्र पत्नीने मोबाइल देण्यास नकार दिला. दिलीप यांनी पत्नीच्या हातातून मोबाइल हिसकावला. मात्र नूतन यांनी मोबाइल पुन्हा परत घेऊन घराबाहेर जाऊन पतीला शिवीगाळ केली. याचा दिलीप यांना राग आला. त्यांनी नूतन यांच्या हातातून मोबाइल हिसकावण्याचा पुन्हा प्रयत्न केला असता नूतन यांनी दिलीप यांच्या हाताला चावा घेतला. आता हा कौटुंबीक वाद पोलिस स्टेशनमध्ये गेला आहे.

Advertisements
Advertisements

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!