सहा वर्षीय शाळकरी बालिकेवर लैंगिक अत्याचार तिच्याच कमरेच्या बेल्टने गळा आवळून खून

हैद्राबाद येथील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणावरून संताप व्यक्त केला जात असतानाच राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातही सहा वर्षीय शाळकरी बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिच्याच कमरेचा शाळेचा पट्टा काढून गळा आवळून खून केल्याची लज्जास्पद घटना घडली आहे. रविवारी बाबुलच्या दाट झाडीमध्ये या निष्पाप चिमुरडीचा मृतदेह सापडल्यानंतर हि हि घटना उघकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह अन्य उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठविला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना अलिगड पोलिस ठाण्याच्या परिसरात घडली. बलात्कार आणि हत्या झालेली ६ वर्षांची मुलगी गावातील सरकारी शाळेत शिकत होती. शनिवारी शाळेच्या कार्यक्रमांमुळे ती शाळेतच होती. दुपारी ३ वाजेपर्यंत मोठ्या संख्येने गावकरीही तेथे होते. त्यानंतर पीडित मुलगी घरी पोहोचली नाही. यावर, कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, परंतु तिचा काही पत्ता लागला नाही. रविवारी सकाळी ग्रामस्थांना खडली गावात मंदिराच्या पाठीमागे बाबूलच्या झाडीत एक निष्पाप रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला. ही माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आणि गावकरी मोठ्या संख्येने तेथे जमा झाले. मारेक्यांनी मुलीच्या शाळेच्या पट्ट्याने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. नराधमांनी इतक्या निर्दयी तिचा गळा आवळा की तिचे डोळेदेखील बाहेर आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
स्थानिकांच्या माहितीवरून पोलीस ठाण्यांसह अपर पोलीस अधीक्षक विपिन शर्मा यांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची माहिती घेतली. पोलिसांनी मृतदेह सनाद शासकीय रुग्णालयात टोंक मुख्यालयात पाठविला आहे. एफएसएल टीमला घटनास्थळी बोलावले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत, परंतु अद्यापपर्यंत आरोपीचा कोणताही क्लू सापडला नाही. त्याचबरोबर या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.