हैद्राबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरण : आरोपींना अटक केल्याचे समजताच जमावाचा पोलीस ठाण्याला घेराव , लाठीमार

#WATCH: Locals hurled slippers on police after police stopped them from entering Shadnagar police station, where the accused in rape&murder case of the woman veterinary doctor, were lodged earlier today. Accused have been shifted to Chanchalguda Central Jail. #Telangana pic.twitter.com/f8nV4yLiw3
— ANI (@ANI) November 30, 2019
आंध्र प्रदेशातील हैदरबादच्या डॉक्टर तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातून देशभर संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. या प्रकरणातील आरोपींना शादनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आल्याचे समजताच शेकडोंच्या जमावाने आम्हाला न्याय हवाय, अशी घोषणाबाजी करतच पोलीस ठाण्याला घेराव घातला. यामध्ये विद्यार्थी आणि महिलांचा मोठा सहभाग होता. कोणताही तपास न करता, कोणतीही सुनावणी न करता या आरोपींना भरचौकात फाशी देण्याची मागणी करत जमावाने जोरदार निदर्शने केली. या नराधमांना समाजात कोणतेही स्थान नाही. एन्काउंटरमध्ये त्यांचा थेट खात्मा केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली.
दरम्यान शेकडोच्या संख्येने जमलेल्या या जमावाने आरोपींना आमच्या हवाली करा, अशी मागणी लावून धरत पोलीस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठिमार केला. त्यामुळे जमाव अधिकच संतप्त झाला आणि त्यांनी पोलिसांवर चपला फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनीही लाठिमार सुरूच ठेवल्याने संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जमाव पांगल्यानंतर पोलिसांनी या चारही आरोपींची शादनगर पोलीस ठाण्यातून चंचलगुडा सेंट्रल जेलमध्ये हलविण्यात आले. संतप्त जमावाकडून हल्ला होण्याच्या भीतीने पोलीस ठाण्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून अतिरिक्त सुरक्षा दलाला तैनात करण्यात आले आहे. आरोपींना कोर्टात नेताना कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे.