गोडसेभक्त खा. प्रज्ञा ठाकूर आणि काँग्रेसनेत्यांमध्ये तू-तू , मै- मै चालूच….

कांग्रेसियों को जिंदा जलाने का पुराना अनुभव है1984 मैं सिखों को और नैना साहनी को तंदूर में जलाने तक का।@RahulGandhi ने आतंकी कहा और उनके विधायक गोवर्धन दांगी मुझे जलाएंगे।ठीक है तो मैं आ रही हूं ब्यावरा उनके निवास मुल्तानपुरा पर दिनांक 8 दिसंबर 2019 समय सायं 4:00 बजे जला लीजिए
— Sadhvi Pragya Singh Thakur (@sadhvipragyag) November 30, 2019
गोडसेभक्तीवरून भाजपच्या भोपाळच्या वादग्रस्त खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि काँग्रेस यांच्यात चांगलेच तू -तू, मै -मै चालू आहे . खरे तर प्रज्ञासिंग ठाकूर गांधी हत्या आणि नथूराम गोडसे बद्दलच्या वक्तव्यामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकतात. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी नथुरामचं समर्थन केलं होतं. त्यानंतर देशभर वादळ निर्माण झालं होतं. त्यावर साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना मी मनापासून कधीच माफ करणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगावं लागलं होतं . त्यानंतर भाजपने साध्वीला सांभाळून बोलण्याची तंबीही दिली होती. मात्र साध्वींची बेताल वक्तव्य काही केल्या कमी होत नाहीत त्यामुळे भाजप अडचणीत आली आहे. लोकसभेत एका चर्चेदरम्यान त्यांनी नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे म्हटले होते त्यावर वाद झाला होता. त्यानंतर काँग्रेसच्या आमदाराने त्यांना जाळून टाकण्याची धमकी दिली होती.
प्रज्ञा यांच्या वक्तव्याविरोधात ब्यावराचे काँग्रेस आमदार गोवर्धन दांगी यांनी आंदोलन केलं होतं. आता फक्त त्यांच्या पुतळा जाळला, त्या इथे आल्या तर त्यांना जाळून टाकू अशी धमकीच त्यांनी दिली होती. त्याला त्याच आक्रमक भाषेत साध्वींनी उत्तर दिलंय. त्या म्हणाल्या काँग्रेसला जिवंत जाळण्याचा मोठा अनुभव आहे. १९८४मध्ये शिखांचं हत्याकांड ते नैना साहनी तंदूरी प्रकरणापर्यंत त्यांना अनुभव आहे. राहुल गांधी यांनी मला दहशतवादी असं म्हटलंय तर त्यांचे आमदार मला जाळण्याची धमकी देत आहेत. असं असेल तर मग ठिक आहे. मी ब्यावरा इथं दांगी यांच्या निवासस्थानी येत आहे. ८ डिसेंबरला दुपारी ४ वाजता येणार आहे तेव्हा मला जाळून टाका असे त्यांनी ट्विट केल्यामुळे हा वाद आणखी चिघळत जाणार असे दिसत आहे.